DAP Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

DAP Fertilizer Shortage : खरिपाच्या तोंडावर डीएपीचा तुटवडा

Kharif Season 2025 : केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र हीच स्थिती आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे.

Team Agrowon

Solpaur News : कृषी विभागाने खरीप हंगामासाठी खतांचे नियोजन केले आहे. मात्र, सध्या अनेक खत विक्रेत्यांकडे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. तर डीएपीचा सध्याचा जिल्ह्यातील उपलब्ध साठा पाहता खरीप हंगामाच्या तोंडावरच तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र हीच स्थिती आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. खरीप हंगामातील सहा महिन्यांकरिता जिल्ह्यासाठी एकूण दोन लाख ३२ हजार ३५६ टन डीएपी मंजूर झाले आहे. कृषी विभागाने दोन लाख ८६ टन खताची मागणी नोंदवली आहे. त्यापैकी २३ हजार ५०२ टन आवंटन मंजूर झाले आहे. तर जिल्ह्यात खरीप हंगामातील डीएपीचा सरासरी वापर हा दोन लाख १६ हजार ६२६ टन आहे.

मात्र, सध्या जिल्ह्यात पाच हजार ३७२ टन डीएपी उपलब्ध आहे. गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर वाफसा आल्यावर खरीप पेरणीला सुरवात होणार आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध डीएपी खताचा साठा पाहता हंगामाच्या सुरवातीलाच तुटवडा निर्माण झाला आहे.

कारण दरम्यान, कृषी सहायकांचा संप सुरू होता. गेल्या १५ दिवसांत एकही रेक डीएपी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीवर अवलंबून न राहता संयुक्त खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अनुदानात वाढ, तरीही टंचाई

डीएपीची कमाल किरकोळ किंमत प्रति ५० किलो पिशवीचा दर एक हजार ३५० रुपये आहे. सरकार त्यासाठी प्रतिटन २१ हजार ९११ रुपये अनुदान देते. तसेच प्रतिटन अतिरिक्त तीन हजार ५०० रुपये अनुदान वाढविले आहे. मात्र, त्याचा आयात खर्च प्रतिटन ५४ हजार १६० रुपये आहे.

ज्यामुळे कंपन्यांना हा फरक भरून काढावा लागतो. वाढत्या खर्चामुळे हे त्यांच्यासाठी अधिकाधिक कठीण होत आहे. त्यामुळे कंपन्यांची किमतीत वाढ करण्याची मागणी आहे. प्रमुख शेती राष्ट्रांकडून आयातीच्या मागणीत वाढ आणि पुरवठ्यात घट यामुळे डीएपीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

डीएपीला पर्याय

डीएपी खताला पर्याय उपलब्ध आहेत. त्याऐवजी शेतकऱ्यांनी २०ः२ः१३, १२ः३२ः१६, १४ः३५ः१४, २४ः२४ः०० या संयुक्त खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare Schemes: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास

Urea Shortage: युरिया टंचाईचा प्रश्न मिटणार? सरकारचा दावा

Storm Damage: वादळाचा पॉलिहाउस, सौरकृषी पंप पॅनेलला तडाखा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती

SCROLL FOR NEXT