DAP Shortage : शेतकऱ्यांनी ‘डीएपी’चा आग्रह धरू नये

Fertilizer Shortage : नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग तूर या पिकाचा हळद, ऊस, केळी या बागायती पिकांसाठी शेतकरी डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी खताचा वापर प्रामुख्याने करतात.
DAP Shortage
DAP ShortageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : आगामी खरीप पेरणी हंगामासाठी शेतकऱ्यांनी डाय-एमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताचा आग्रह न करता इतर पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग तूर या पिकाचा हळद, ऊस, केळी या बागायती पिकांसाठी शेतकरी डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी खताचा वापर प्रामुख्याने करतात. परंतु सध्या जिल्ह्याला डीएपी खताचा पुरवठा कमी असल्यामुळे बाजारात खत उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये अनेक ठिकाणी वाद होत आहेत.

DAP Shortage
Fertilizer Linking : खत लिकिंगबाबत कारवाईच्या सूचना

याबाबत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मृद्-परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या माहितीनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली अवलंबून, विविध खतांचा समन्वित वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. सध्या बाजारात डीएपी खताची मागणी जास्त असल्याने त्याची कमी भासू शकते.

डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असतो. त्याची कमतरता भरण्यासाठी संयुक्त खताचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. डीएपी खताला पर्याय म्हणून एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट): १६ टक्के स्फुरद व सल्फर तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. तेलबिया पिकांसाठी विशेषतः लाभदायी खत आहे.

DAP Shortage
Illegal Fertilizer Sale : अनधिकृत खते विकणारे दोघे पोलिसाच्या ताब्यात

यासोबतच एनपीके-१०:२६:२६, एनपीके-२०:२०:०:१३, एनपीके-१२:३२:१६, एनपीके-१५:१५:१५ या खते नत्र, स्फुरद आणि पोटॅशियमसह पालाश (सफा) अन्नद्रव्यही पुरवतात. ट्रिपल सुपर फॉस्फेट (टीएसपी): ४६ टक्के स्फुरद आहे, डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी अधिक टीएसपी एक गोणी वापरता येऊ शकते.

डीएपीच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी अधिक एसएसपी तीन गोण्या किंवा युरिया अर्धी गोणी, टीएसपी एक गोणी अशा मिश्रणाने पिकांना आवश्यक नत्र-स्फुरद पुरवठा सुनिश्चित होतो. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फक्त डीएपीवर अवलंबून न राहता, बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून पीक उत्पादन क्षमता वाढवावी, असे कृषी विकास अधिकारी डॉ. ऐतवडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com