Leopard  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Threat : खानदेशात सातपुडासह सातमाळा भागात बिबट्यांची दहशत

Khandesh Wildlife Fear : खानदेशात सातपुडा पर्वतासह दक्षिण, पश्चिम भागातील सातमाळा, अजिंठा डोंगराच्या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. दरवर्षी या भागात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतासह दक्षिण, पश्चिम भागातील सातमाळा, अजिंठा डोंगराच्या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. दरवर्षी या भागात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी जात आहे. वन विभागाकडून हे मृत्यू, बळी रोखणे शक्य होत नसून, प्रशासनाचे अपयश यात दिसत आहे.

सातपुडा पर्वत खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबारात आहे. जळगावातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव हे तालुके सातपुड्याच्या पायथ्याशी आहेत.

या क्षेत्रांमधील मोठा भाग सातपुड्यात आहे. या भागात केळी, ऊस, पपई व अन्य बागायती पिकांची शेती आहे. या भागात बिबट्याची दहशत कायम आहे. तर सातमाळा पर्वत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगावलगत आहे. अजिंठा डोंगर जामनेरनजीक आहे. या भागातील शेतकरी वर्गात बारमाही बिबट्याची दहशत असते. कारण दर महिन्यात बिबट्याचा हल्ला, पशुधनाचा मृत्यू, जीवितहानी असे प्रकार घडत असतात.

शिवारातील शेळ्या, मेढ्या या सुरक्षित नाहीत. पशुधनावर रोजच बिबट्याचे हल्ले होत असतात. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जळगावातील चाळीसगाव, पाचोरा भागात बिबट्याचे हल्ले व त्यात होणारे मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे.

नंदुरबारात आजी-नातवाचा बळी

नुकताच बिबट्याच्या हल्ल्यात नंदुरबारातील तळोदा भागात आजी व नातवाचा मृत्यू झाला आहे. काजीपूर गावात ही घटना घडली आहे. श्रावण तडवी व साकराबाई तडवी अशी मृतांची नावे आहेत. काजीपूर शिवारात तडवी कुटुंब रखवालदारीसाठी आले होते. हे कुटुंब मूळचे भगदरी येथील आहे.

साकराबाई या शेळ्या चराईसंबंधी शिवारात गेल्या होत्या. त्यांना उशीर झाला. त्यांच्या शोधार्थ मुलगी व श्रावण हे शिवारात गेले होते. शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला केला व त्यास नजीकच्या उसाच्या शेतात ओढून नेले. साकराबाई यांचाही शोध घेतला असता त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचे आढळले. मागील पाच-सहा दिवसांत तळोदा व परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

चिनोदा (ता. तळोदा) येथे एका आठ वर्षीय बालकावरही काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. कार्तिक राजेश पाडवी, असे त्या बालकाचे नाव असून, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. तसेच शहादा तालुक्यातील चिखली बुद्रुक येथेही सोमवारी (ता. १९) बिबट्याने एका नऊ वर्षीय बालकावर हल्ला केला. लवकुश बारक्या पावरा असे या बालकाचे नाव असून, त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Due Amount: पंढरपूरच्या जागा विक्रीनंतर देणी देणार

Corruption Action: शेगावमध्ये दोन तलाठ्यांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल

Farmer Loan Waiver: दीड हजार कोटींच्या कर्जमाफीचा प्रस्ताव

Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा सव्वातीन लाख हेक्टरला फटका

Beed Flood: बीडमधील पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच

SCROLL FOR NEXT