Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Subsidy : रब्बी प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

Rabi Season : राज्याच्या रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना निविष्ठांकरीता अनुदान मिळणार आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना निविष्ठांकरीता अनुदान मिळणार आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाचे उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना निविष्ठांच्या अनुदानासाठी रविवारपर्यंत (ता.६) ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. २०२४-२५ मधील रब्बी हंगाम नियोजनाचा भाग म्हणून अन्न आणि पोषण सुरक्षा, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, गळीतधान्य पिके या उपक्रमांमधून पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

त्यापैकी हरभरा, गहू, जवस, करडई, भुईमूग व मोहरी या पिकांकरिता अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी प्रणालीद्वारे mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बियाणे घटकासाठी सध्या ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटांमार्फत राबविली जाणार आहेत. प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला कमाल दोन हेक्टरसाठी बियाणे मिळेल. निविष्ठांचा पुरवठ्यासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT