Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदल पाहणार शेतकऱ्यांची परीक्षा; कधी उष्णतेची लाट तर कधी अवकळी?

Dhananjay Sanap

देशात जानेवारी ते मार्च या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवली आहे. हवामान विभागाने सोमवारी पाऊस आणि तापमानाचा अंदाज जाहीर केला. आता या बातम्या तुमच्यापर्यंत पोहचल्या असतीलच. पण जानेवारी ते मार्च या काळात जास्त पाऊस पडणार म्हणजे काय होणार? तर देशात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सरासरी ६९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. पण यंदा तो ११२ टक्क्यांपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच देशातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसू शकतो. मॉन्सूनचा काळ आपल्याकडे असतो चार महिन्यांचा. म्हणजेच जून ते सप्टेंबरचा. मॉन्सूनचे वारे परत फिरतात. तेव्हा मॉन्सून हंगाम संपल्याचं हवामान विभागाकडून जाहीर केलं जातं. आता त्यानंतर जो पाऊस पडतो त्यालाच अवकाळी पाऊस म्हणतात. आता हे का सांगितलं तर त्याचं कारण यंदा ऑक्टोबर ते ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९६.४ टक्के पाऊस पडला. म्हणजेच काय तर राज्यातील अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलं आहे.

दुसरीकडे जानेवारी ते मार्च या काळात थंडी कमी आणि उष्णतेच्या लाटा अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान संस्थेनं वर्तवली आहे. जागतिक हवामान संस्थांनी याबद्दलचे अंदाज वेळोवेळी जाहीर केलेले आहेत. २०२४ च्या जूनपर्यंत एल-निनो सक्रिय राहू शकतो, असा अंदाज जगभरातील विविध हवामान संस्थांनी वर्तवला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी धोक्याचे संकेत आहेत. कारण यंदा खरीप आणि रब्बी पिकांवर एल-निनोमुळे परिणाम झाला. देशातील पावसाचे प्रमाण कमी राहिलं. जून २०२४ पर्यंत एल सक्रिय राहिला तर पूर्व मॉन्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. 

देशात २०२३ जुलैच्या मध्यापासूनच एल निनो सक्रिय झाला होता. त्यामुळे खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला. ऑगस्टपासून एल-निनोची दाहकता अधिक जाणवली, असं अमेरिकेच्या क्लायमेट प्रीडिक्शन सेंटर सांगितलंय. मॉन्सून कालावधीत एल निनोमुळे सध्या देशातील २६ टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात जागतिक स्तरावर विक्रमी उष्णतेची नोंद झाली. तशी ती गेल्यावर्षीही झाली होती. २०१६ वर्ष उष्णतेचं होतं. पण मागच्या १०१ वर्षातील सर्वाधिक तापमानाचं वर्ष म्हणून २०२३ या वर्षाची नोंद झाली.

एल-निनो जूनपर्यंत सक्रिय राहण्याची ६२ टक्के शक्यता आहे, अशी माहिती नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन नुकतीच दिली आहे. ही संस्था आहे अमेरिकेतील. पण प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळं का घडतंय? यासाठी फक्त एल निनो कारणीभूत नाही. तर हवामानातील बदलही कारणीभूत आहेत, असं हवामान अभ्यासकांचं मत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारं औद्योगिकीकरण आणि त्यातून होणारं कार्बनचं उत्सर्जन यामुळे जागतिक तापमानात वाढ होऊ लागली आहे. जागतिक तापमानात वाढ होत राहिली तर शेतकऱ्यांना नगदी पिकं घेणं बंद करावं लागेल, असे विविध संस्थांनी अहवलातून सांगितलं आहे. पण त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात. कारण औद्योगिकीकरणाच्या आड विविध घटकांचे हितसंबंध दडलेली आहेत. पण ते असो. 

२०२४ च्या मार्च दरम्यान सुपर एल निनो सक्रिय होईल असाही जागतिक हवामान संस्थांचा अंदाज आहे. म्हणजेच मार्चनंतर आपल्याकडे सुरू होणारा उन्हाळा अधिक उष्ण ठरू शकतो, असा याचा अर्थ.  सुपर एल निनोत काय होतं? तर प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होते. त्यामुळं काय होतं पृथ्वीवरील हवामानात बदल घडवून येतात. त्यामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी आणि पुरासारखे गंभीर संकट ओढवले जाते. पण त्याचा जबरी तडाखा अर्थातच शेती क्षेत्राला बसतो. त्यामुळे उत्पादकतेत घट येऊन जागतिक अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिलेला आहे. जगाचं लक्ष जागतिक तापमान वाढीकडे लागलेलं आहे. अन्नसुरक्षेचा मुद्दा जागतिक स्तरावर चांगलाच तापणार आहे. कारण जगातील बहुतांश देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यात अन्नसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. 

थोडक्यात, निसर्गाचा लहरीपणा यंदाही शेतकऱ्यांची परीक्षा घेईल. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा असं चित्र दिसेल. त्यामुळं निसर्गाच्या लहरीपणासोबत तग धरून राहणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं, असा जाणकारांचा सल्ला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना साथ द्यावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने जानेवारी ते मार्चचा वर्तवलेला हवामान अंदाज तेच सांगतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT