Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

NAMO Shetkari Scheme : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ; नमो शेतकरी महासन्मान निधीचा गुरुवारी पहिला हप्ता

Namo Shetkari Yojana : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा पहिला हप्ता २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत कार्यक्रमात दिला जाणार आहे.

Swapnil Shinde

NAMO Farmer Scheme : शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली. या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये २६ ऑक्टोबर रोजी १ कोटी १५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मोदी सरकारकडून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ६,००० रुपयांचा वार्षिक रोख लाभ दिला जातो, तो २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. सरकार लवकरच कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधींतर्गत प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. या अंमलबजावणीचा लवकरच शुभारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी मंजूरी केला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिला जाणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे ४ हजार रुपये मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT