Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रमाणीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेस सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मंत्रालयात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेच्या लाभापासून विविध अडचणींमुळे वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान व नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती, त्याअंतर्गत आतापर्यंत ४ लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
मात्र अजूनही आठ लाख शेतकऱ्यांची पडताळणी बाकी असल्याने विशेष मोहिमेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रशासनाने केली. भूमी अभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. पुढील सात दिवसांत ही पडताळणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाआयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीता शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.