Surat-Chennai Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Surat-Chennai Highway Greenfield: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डला ‘समृद्धी’प्रमाणे मोबदला द्या

Farmers Demand Compensation : शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे सांगत येत्या ३० एप्रिलनंतर मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.

Team Agrowon

Farmer Protest Solapur : सोलापुरातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे (Samruddhi Mahamarg) मोबदला मिळाला पाहिजे. या ग्रीन फील्डचा मोबदला एकरी दिला जातो आहे, तर समृद्धी महामार्गाचा मोबदला चौरस फुटांवर दिला गेला. हा योग्य न्याय होऊ शकत नाही.

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे सांगत येत्या ३० एप्रिलनंतर मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांना समृद्धीप्रमाणे भाव मिळावा, यासाठी अक्कलकोट येथील सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर सोमवारी (ता. २७) बॅगेहळ्ळी फाट्याजवळ ग्रीन फील्ड संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी म्हेत्रे बोलत होते.

यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कासेगाव, तुळजापूर, बार्शी येथील सर्वपक्षीय नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बाळासाहेब मोरे आणि स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनात उपस्थित राहून रोष प्रकट केला.

म्हेत्रे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आणि न्यायाला धरून आहेत. सरकारने त्याचा विचार करायला हवा. त्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत.

पण याकडे दुर्लक्ष करून तशाच पद्धतीने संपादन होणार असेल, तर ते कदापि होऊ देणार नाही, आता ही आंदोलनाची सुरुवात आहे, हे आंदोलन पुढे केवळ आंदोलन राहणार नाही, तर जन आंदोलन होईल, असेही ते म्हणाले.

या वेळी माजी नगरसेवक महेश हिंडोळे, शेतकरी सुरेखा होळीकट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील बंडगर, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शेतकरी ताराबाई हांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष केंगनाळकर, जिल्हा महिला प्रमुख प्रिया बसवंती, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे, ‘आरपीआय’चे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रयत क्रांतीचे तालुका प्रमुख नागेश नाईकवाडी, रयत क्रांतीचे महिला तालुका प्रमुख प्रियांका दोड्याळे आदी सहभागी झाले होते. समितीकडून संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT