Team Agrowon
महाराष्ट्रातील देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५ जी) हा देहू ते पंढरपूर असा हा १३० किमी लांबीचा असणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा आळंदी ते पंढरपूर असा २३४ किमी लांबीचा आहे.
दोन्ही पालखी मार्ग विकसित करताना रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या महामार्गावर महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल.
पालखी मार्गावर चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.