Vidhansabha 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Satana Vidhansabha Election : शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

Vidhansabha Election 2024 : केळझर चारी कृती समितीसह ग्रामस्थांचे निवेदन

Team Agrowon

Satana News : सटाणा : बागलाण तालुक्यातील केळझर डावा कालवा व थेट वायगाव दुधेपर्यंत जाणारा चारी क्र. ८ चे काम गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा लाभक्षेत्रातील २० ते २५ गावांतील संतप्त शेतकऱ्यांतर्फे केळझर चारी क्रमांक आठ कृती समितीने नायब तहसीलदार सचिन मारके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. काही गावांपर्यंत केळझर चारी क्रमांक आठची कामे झाली, परंतु अद्याप अनेक कामे अपूर्ण आहेत.

कौतिकपाडे (ता. बागलाण) पासून पुढे चारीचे सर्वेक्षण व निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मान्यता मिळूनही काम ठप्प आहे. धरणाच्या निर्मितीपासून प्रलंबित असलेल्या कालव्याचे फेरसर्वेक्षण करून नवीन इस्टिमेट तयार करण्यात यावे, या कालव्याची वहन क्षमता ८० क्युसेक असून मूळ क्षमता १५० ते २०० करून कालव्याचे जुने स्ट्रक्चर बदलून तत्काळ नवीन करावे. १५ किलोमीटरपर्यंत एक्स्प्रेस कॅनॉल टाकून केळझर चारीचे काम पुढे नेल्यास शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी वाहून जाईल.

केळझर चारीचे वन जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरते, अशा ठिकाणी काँक्रिट नाली किंवा सिमेंट पाइप टाकण्यात यावेत. नित्कृष्ठ कामाची चौकशी करून संबंधितांना निलंबित करावे. अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कृती समितीसह ग्रामस्थांनी दिला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. १८) कार्यक्षेत्रातील चौगांव (ता. बागलाण) येथे आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

सुधाकर पाटील, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, जगन रौंदळ, कैलास मोरकर, ललित शेवाळे, उत्तम शेवाळे, भाऊसाहेब शिरसाठ, दीपक ठोके, लखन पवार, प्रकाश शेवाळे, आबा रौंदळ, नाना रौंदळ, युवराज निकम, संजय शेवाळे, गोविंद जाधव, किरण शेवाळे आदींसह चौगाव, कौतिक पाडे, अजमेर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे यांच्यासह कऱ्हे परिसरातील शेतकरी तहसीलदारांना निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT