Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Opposition: प्रसंगी रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही

Farmer Protest: शक्तिपीठ महामार्ग पूर्ण रद्द व्हावा, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्ग पूर्ण रद्द व्हावा, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रसंगी रक्त सांडू, पण महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. या वेळी आंदोलकांनी ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘पर्यावरणविरोधी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’, ‘शेती वाचवा, देश वाचवा’, अशा घोषणा दिल्या.

महामार्गाला विरोधासाठी शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले होते. समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकराच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत या महामार्गाविरोधात आवाज बुलंद केला. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रकाश पाटील, आनंदा देसाई, दादासाहेब मगदूम आदींसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Rate: देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भाव

Bacchu Kadu: स्वतंत्र लढा उभारून तत्काळ कर्जमाफी मिळवावी

Grape Season: अर्ली हंगामाच्या इतिहासात मुहूर्ताला यंदा उच्चांकी दर

Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार

Rain Alert: पावसाचा जोर ओसरणार, तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT