Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Land Acquisition : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातून जाणार आहे. यामुळे शेकडो एकर बागायत जमिनीचे या महामार्गासाठी संपादित करण्यात येत आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातून जाणार आहे. यामुळे शेकडो एकर बागायत जमिनीचे या महामार्गासाठी संपादित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांपासून मंत्रालयापर्यंत सर्वांना ई-मेल पाठवून नाराजी व्यक्त करत आहेत.

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावापासून २ कि.मी. अंतरावर जवळगाव मध्यम प्रकल्प हे धरण असून, या प्रकल्पासाठी जवळगाव या गावातील बहुतांश शेतजमिनीचे भूसंपादन राज्य शासनाने केले आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळलं सांगलीलाही वगळा; खासदार विशाल पाटील यांचा सरकारला इशारा

बाधित धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तसेच धरणग्रस्तांना लाभ मिळण्यासाठी हत्तीज, शेळगाव, राळेरास, धामणगाव या धरणाच्या कालवा सिंचनातील लाभक्षेत्रात पुनर्वसन नवीन शर्तखाली ठरावीक रक्कम भरल्यानंतर मर्यादित स्वरूपात शेतजमिनी मिळाल्या आहेत. पुनर्वसनातील या शेतजमिनीचे भूसंपादन शक्तिपीठ महामार्गासाठी केले जात असल्याने या शेतकऱ्यांवर आता पुन्हा भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.

बागायत जमिनींना फटका

रुई, हत्तीज, राळेरास, धामणगाव, शेळगाव (आर), मसले चौधरी, घाटणे, मोहोळ व पंढरपूर परिसरातील गावातील शेतजमीन काळी व सुपीक आहे. यातील काही शेतजमिनी जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील असून सीना व भीमा नदी परिसरातील सुपीक व कायम ओलिताखाली शेतजमिनीचे संपादन होत आहे. यामुळे बागायतदारांना भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. धरणग्रस्त अल्पभूधारक शेतकरी भूमिहिन झाल्यास त्यांच्या उपजीविकेचे काय होणार असा सवाल आता या परिसरातील संतप्त शेतकरी करत आहेत.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : भाजपमधील खासदारांचाच शक्तिपीठ महामार्गाला विरोध; मुख्यमंत्र्यांनी पर्यायी मार्ग काढावा

सोलापूर जिल्ह्यातूनही विरोध

कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने कोल्हापूर जिल्हा या महामार्गातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी नागपूरपासून सांगलीपर्यंत कोणाचाही विरोध नाही असे शासनाने गृहीत धरले आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत आहे.

ठळक बाबी

सोलापूर जिल्ह्यातील तसेच बार्शी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या हरकती

जिल्ह्यातील हरकती, आंदोलने, मोर्चे या सनदशीर मार्गाच्या विरोधाची दखल घेणे आवश्यक

शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही म्हणून बळजबरीच्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत एकवाक्यता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शक्तिपीठबाबत वाढत्या असंतोषामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता

बागायती जमिनींचे होणार नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com