Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest: ‘शक्तिपीठ’ रद्द होईपर्यंत शेतकरी लढा देणार

Shaktipith Highway: ‘जमिनी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची... शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे... सरकारचा धिक्कार असो...’ अशा घोषणात देत शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीसह शेतकऱ्यांनी दिल्या.

Team Agrowon

Sangali News: ‘जमिनी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची... शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे... सरकारचा धिक्कार असो...’ अशा घोषणात देत शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीसह शेतकऱ्यांनी दिल्या. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार आहे, अशा इशाराही या वेळी देण्यात आला.

सांगली येथील अंकली येथे मंगळवारी (ता. १) शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या वेळी खासदार विशाल पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे यांच्यासह जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकरी उपस्थित होते.

अंकली येथे सकाळी दहा वाजल्यापासून चार तालुक्यांतील १९ गावातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोकोसाठी एकत्र आले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्तही करण्यात आला. शेतकरी आक्रमक झाले होते. आम्ही जमिनी देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना भूमिहीन करत आहेत.

त्यांना ठेकेदार जगवायचे आहेत. जिल्ह्यातील शेती संपवणारा हा प्रकल्प आहे, अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही, तोपर्यंत लढा सुरु ठेवू अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.खासदार विशाल पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील ७ हजार खातेदारांची जमीन या महामार्गात जाणार आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण जमीन जाते.

शासन आमची पिकाऊ शेती कवडीमोलाने खरेदी करत आहे, याचं दुःख आहे. एक लाख कोटीचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी ८० टक्के इतकी रक्कम महामार्गासाठी तर २० टक्के रक्कम ही जमीन खरेदीसाठी वापरली जाणार आहे. या बाबत सरकारने भूमिका स्पष्ट मांडावी. प्रत्येक गावात बैठका घेऊन सविस्तर चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्या पाठीशी उभा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare Schemes: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास

Urea Shortage: युरिया टंचाईचा प्रश्न मिटणार? सरकारचा दावा

Storm Damage: वादळाचा पॉलिहाउस, सौरकृषी पंप पॅनेलला तडाखा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती

SCROLL FOR NEXT