AgriStack Scheme Update: डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) अंतर्गत पीक पाहणी करणाऱ्या सहायकांना मानधन अदा करण्यासाठी असलेली गावातील किमान ६० टक्के शेतकरी पीक नोंदणीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत डिजिटल पीक पाहणी कामाच्या सुलभ अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (दि. २२ ऑक्टोबर) कृषी विभागाने जारी केला. .डिजिटल अॅग्रीकल्चर मिशन अंतर्गत राज्यात 'अॅग्रिस्टॅक' योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. याआधीच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक पाहणी सहायकांना मानधन अदा करण्यासाठी संबंधित गावात किमान ६० टक्के पीक नोंदणी शेतकऱ्यांकडून झालेली असणे आवश्यक होती..Digital Crop Survey : डिजिटल क्रॉप सर्व्हे ५० टक्के पूर्ण करा, अन्यथा कारवाई .त्यानंतर ३ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार, राज्यात केंद्राची ही नवीन प्रणाली लागू करून सहायकांमार्फत १०० टक्के पीक पाहणी करण्याची सुधारित कार्यपद्धती व मानधनाचे दर (निर्भेळ पिकासाठी १० रुपये व मिश्र पिकासाठी १२ रुपये प्रति Owner Plot) निश्चित करण्यात आले. .e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.दरम्यान, ९ सप्टेंबर २०२६ पासून डीसीएस- एमएच प्रणालीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी स्तरावर स्व-नोंदणी सुरू करण्यात आली. जमाबंदी आयुक्तांनी शेतकरी व सहायक या दोन्ही स्तरांवर झालेल्या एकत्रित नोंदणीवर सहायकांना मानधन अदा करण्याची मागणी केली होती..परंतु, शासकीय निधीचा योग्य वापर आणि प्रत्यक्ष पार पाडलेल्या कामाच्या आधारेच मानधन (Payment On Work Done Basis) देण्याच्या प्रशासकीय तत्त्वाचा विचार करता, शेतकऱ्यांनी स्वतः केलेल्या नोंदणीचे मानधन सहायकाला देणे योग्य ठरत नाही. तरीही, ६० टक्के शेतकरी नोंदणीच्या अटीमुळे सहायकांच्या मानधनात येणारी अडचण दूर व्हावी, यासाठी अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..त्यानुसार, पीक पाहणी करणाऱ्या सहायकांना मानधन अदा करण्यासाठी गावातील किमान ६० टक्के पीक पाहणी शेतकऱ्यांकडून झालेली असण्याची अट सर्व हंगामांसाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे..पीक पाहणी सहायकाला केवळ त्याने स्वतः प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंदवलेल्या ओनर्स प्लॉटच्या संख्येच्या आधारेच सुधारित दराने (निर्भेळ पिकासाठी १० रुपये आणि मिश्र पिकासाठी १२ रुपये प्रति ओनर प्लॉट) मानधन अदा केले जाणार आहे..शेतकऱ्यानं स्वतः केलेल्या पीक पाहणीचं मानधन सहायकाला नाही शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल अॅपद्वारे पूर्ण केलेल्या पीक नोंदणीसाठी संबंधित पीक पाहणी सहायकाला कोणतेही मानधन मिळणार नाही. ही अट वगळता सर्व अटी व शर्ती आहे तशाच कायम राहतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.