Jejuri Gad : जेजुरी भंडाऱ्याची उधळण, शोभेच्या दारूची आतिषबाजी, आपटापूजन, देवभेट, खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा, पारंपारिक गीतांचे गायन व विद्युत रोषणाई, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत खंडोबाचा दसरा उत्सव रंगला. मंगळवारी मध्यरात्री पारंपारिक पद्धतीने खंडोबाचा देवभेट सोहळा रंगला. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविण्याऱ्या मर्दानी दसऱ्याची तब्बल अठरा तासानंतर सांगता झाली..दसऱ्यानिमित्त मंगळवारी सकाळी बालद्वारीतील घटउत्थापन करण्यात आले. उत्सवमूर्तीची पूजा करून भंडार घरात ठेवण्यात आल्या. खंडोबा मंदिरावरील मानाचा मुख्य भगवा ध्वज पूजन, नगरखाना पूजन, ऐतिहासिक खंडा पूजन विश्वस्तांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. .Paddy Farming Crisis: भातशेती वाचविण्यासाठी धडपड.सायंकाळी सहा वाजता गडावरील पालखी सोहळा देवभेटीसाठी मार्गस्थ झाला. या वेळी इनामदार व मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, पोपटराव खोमणे, मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, अनिल सौंदडे, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते..Drought Situation: ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या’.पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू असताना ग्रामस्थ व भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केली. पालखी महाद्वारातून सुसुरटिंगीकडे मार्गस्थ झाली. यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. भाविकांना भंडाऱ्याची उधळण केली. रात्री नऊ वाजता कडेपठारच्या पालखीचे प्रस्थान झाले. मंदिर प्रदक्षिणा घेऊन डोंगरावरील सुसरटिंगीवर आणण्यात आली..मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रमणा परिसरातील डोंगरावर कडेपठारची पालखी व पायथ्याला असलेल्या गडावरची पालखी यांच्यातील उत्सवमूर्तींची आरशात भेटाभेट झाली. त्यानंतर आपटापूजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दोन तास डोंगर परिसर दणाणून गेला होता. विजेच्या व फटाक्यांच्या प्रकाशाने डोंगर उजळला होता. या वेळी भाविकांनी एकमेकांना अलिंगन दिले. कडेपठारच्या डोंगरात खंडोबाचा जयघोष करण्यात आला. विद्युतरोषणाईमुळे कडेपठारचा डोंगर रात्रभर जागा होता. .कडेपठारची पालखी पुन्हा कडेपठार मंदिराकडे मार्गस्थ झाली, तर गडावरची पालखी जुनी जेजुरीमार्गे शहरात आणण्यात आली. महाद्वार रस्त्याने पालखी गडावर आणण्यात आली. रांगोळ्या काढून व फटाके वाजवून पालखीचे महाद्वारात स्वागत करण्यात आले.पालखीची मंदिर प्रदक्षिणा घेऊन उत्सवमूर्ती भांडारगृहात ठेवण्यात आल्या. रोजमारा (धान्य) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. रात्रभर सनई-चौघडा व शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू होती. कलावंतांनी पालखी पुढे हजेरी लावली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.