Farmers Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Management : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Farmers Training : स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘सोयाबीन पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान’ विषयक एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

Washim News : स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘सोयाबीन पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान’ विषयक एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक शेतीतंत्रज्ञान, कीड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढीच्या पद्धतींचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे होते. त्यांनी तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी दर्जेदार वाण, माती परीक्षण व एकात्मिक शेतीपद्धतीवर भर दिला. पिकशास्त्र विषयतज्ज्ञ टी. एस. देशमुख यांनी पेरणीचे योग्य अंतर, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व जैविक पद्धतीचे महत्त्व सांगितले.

तर अर्थशास्त्रतज्ञ डॉ. डी. एन. इंगोले यांनी उत्पादन खर्च कमी करत नफा वाढवण्याच्या मार्गांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पीडीकेव्ही अंबा आणि फुले दूर्वा या सुधारित वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

या वाणांना अधिक उत्पादन क्षमता व रोगप्रतिकारशक्ती लाभलेली असून, बाजारमूल्याच्या दृष्टीनेही त्या उपयुक्त ठरतात. खडकिसदर, आगरवाडी, मौजा, शेलगाव राजगुरे आणि वाघी येथील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. एस. देशमुख यांनी केले तर आभार अक्षय गिरी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

Agrowon Podcast: सोयाबीनवरील दबाव कायम; मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT