Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : शेतकऱ्यांना आठ दिवसांत पीकविमा परतावा मिळणार

Crop Damage : पीकविमा न मिळालेल्या आंबा, काजू बागायतदारांना आठ दिवसांत परतावा मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना दिले.

Team Agrowon

Sindhudurg News : पीकविमा न मिळालेल्या आंबा, काजू बागायतदारांना आठ दिवसांत परतावा मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकरी अद्याप आंबा, काजू पीकविमा परताव्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा परतावा द्यावा अन्यथा २९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता.

त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २१) माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत, राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केली. कृषी अधीक्षकांनी आठ दिवसांत परतावा मिळणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आठ दिवसांत परतावा मिळण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेकडून होणारे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT