Crop Insurance : एक रुपयातील पीकविमा योजना बंद करण्याची शिफारस

Recommendation to Discontinue Crop Insurance Scheme : ‘बीड पॅटर्न’ म्हणून गाजावाजा करण्यात आलेल्या ‘एक रुपयातील पीकविमा’ योजनेत तब्बल ३५० कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ही योजना बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता.२१) पत्रकारांशी बोलताना केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘बीड पॅटर्न’ म्हणून गाजावाजा करण्यात आलेल्या ‘एक रुपयातील पीकविमा’ योजनेत तब्बल ३५० कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ही योजना बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता.२१) पत्रकारांशी बोलताना केला. कृषी खात्यासाठी बीड पॅटर्न हा भ्रष्टाचाराचा पॅटर्न होता, असे सांगत धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील निर्णयाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने एक रुपयात पीकविमा योजना आणली. बीड पॅटर्न म्हणून गाजावाजा करून आपलीच पाठ थोपटून घेतली. त्यानंतर कृषी आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समजते. या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्यासंदर्भात अनेक प्रकरण समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : कधी करतायं शेतकऱ्यांची कर्जमाफी?; वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल

खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले. त्यातील एक लाख ९ हजारांपेक्षा अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले, ही सर्वांसाठीच धक्‍कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ‘एक रुपयात पीकविमा’ प्रकरणात आता बोगस अर्जांवरून शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नये. कारण मंत्र्यांच्या सूचनेशिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांचे वाटोळं भाजपने केलं, वडेट्टीवार यांची खोचक टीका

खरेदीच्या धोरणातही बदल

कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणातही सोयीनुसार बदल केला. डीबीटीसारखी पारदर्शी प्रक्रिया टाळत थेट कृषी साहित्य खरेदीचा घाट घालण्यात आला. त्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साशंकता व्यक्‍त करीत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील निर्णयाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक’

बारामती येथील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून देखील अनुदानाच्या नावावर पैसे उकळण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर या प्रकरणात संशयाची सुई आहे. त्यामुळे सत्ताधारीच शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्‍नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

पीकविम्यातील भ्रष्टाचाराच्या पॅटर्नबाबत हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांनी मुद्दा मांडला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता एक रुपयातील पीकविमा योजनाच बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
विजय वडेट्टीवार, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com