Farmers Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्जासाठी कागदपत्रांच्या जंत्रीने शेतकऱ्यांस मनस्ताप

Agriculture Loan : एका शेतकऱ्याने बँकेकडून एक लाख ६० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. ते व्याजासह एक लाख ७९ हजार रुपये एवढे भरले. या शेतकऱ्याला शेतीसंबंधी निधीची गरज असल्याने अधिकच्या कर्जाची मागणी केली.

Team Agrowon

Jalgaon News : आव्हाणे (ता. जळगाव) येथील एका बँकेत ‘नियमित कर्जदार’ शेतकऱ्यास अधिकच्या पीककर्जासाठी अडथळ्याची स्पर्धा पार करावी लागत असल्याने त्यांस मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील एका शेतकऱ्याने बँकेकडून एक लाख ६० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. ते व्याजासह एक लाख ७९ हजार रुपये एवढे भरले. या शेतकऱ्याला शेतीसंबंधी निधीची गरज असल्याने अधिकच्या कर्जाची मागणी केली.

त्यावर बँकेने ही मोठी प्रक्रिया असते, वेळ लागू शकतो, असे सांगितले. तसेच शेताचा नकाशा, सर्व फेरफार, शेतीचे मूल्यांकन पत्र आदी कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी शेतकऱ्याने दाखविली.

परंतु ज्या शेती गटावर कर्ज घ्यायचे आहे, त्या गटाव्यतिरिक्त खाते उताऱ्यामध्ये नमूद असलेल्या अन्य गटावर कर्ज घेतल्याचा संशय व्यक्त करून त्या गटावर कर्ज न घेतल्याचे दाखले, पत्र गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींकडून आणून देण्याची नवी अट टाकण्यात आली.

पण ज्या गटासाठी कर्जच घ्यायचे नाही किंवा सोसायटीकडून कर्जही त्यावर घेतलेले नाही त्याची कागदपत्रे, दाखले कशाला हवीत, असा प्रश्‍न शेतकऱ्याने केला. पण बँकिंगचे नियम आहेत, त्याबाहेर आम्हाला काम करता येत नाहीत, असे शेतकऱ्याला बँकेकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना बँकांत पीककर्जासाठी खेटे घालावे लागतात. त्यात बँकेचे कर्मचारी कुठलीही कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत टाळाटाळ करतात, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन आव्हाणे येथील बँकेतील संबंधितांना याबाबत विचारणा करावी, अशी मागणीही शेतकऱ्याने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT