Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात कृषी फीडरवर ग्रामीण भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विजेच्या सततच्या हुलकावणीने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांचा हंगाम हातातून जाण्याची भीती आहे.

यंदा नदी, नाले, विहिरीत मुबलक जलसाठा आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीने पिके उद्‍ध्वस्त झाली. संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. उत्पन्नात घट झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने आता रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे.

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यासाठी ओलीत करणे सुरू केले आहे. शेतकरी जागली करून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. विजेचा लोड वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रात्री तसेच दिवसाही वीज मिळण्याच्या वेळेत विजेचा लपंडाव होत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

वीज आल्यानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करण्यासाठी रात्री-बेरात्री शेतात जावे लागते. शिवाय, ओलीत पूर्णपणे होत नाही. आधीच शेतकरी खरीप हंगाम गेल्याने अडचणीत आला आहे. त्यानंतर जलसाठा असल्याने शेतकरी खरीप तसेच रब्बी पिकांचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.

कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र अजूनही ती मागणी पूर्ण झालेली नाही. कृषिपंपाकरिता वेगळे फिडर आहे. या वाहिनीवर गावठाणचे फिडर वेगळे काढले आहे.

कृषी फिडरवर वीज मिळत नसल्याने काही शेतकरी गावठाण वरून वीजपुरवठा घेत आहे. त्यामुळे गावठाण फिडरही वारंवार बंद पडत आहे. सध्या विजेच्या मागणीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मागणीनुसार वीज मिळत नाही. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कार्यालयाचे उंबरठे झिजून शेतकरी त्रस्त

कृषिपंपासाठी वीजपुरवठा मिळावा यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. बंद पडलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारतात. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. काही शेतकऱ्यांना मागणी करूनही वीजपुरवठा मिळालेला नाही. या प्रकारामुळे त्रस्त झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT