Agriculture Electricity : भारनियमन बंद करा, अन्यथा आंदोलन

Electricity Issue : सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असताना वीजपुरवठा होत नसल्याने ते देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे खरिपातील पिके करपण्याची भीती असल्याने भारनियमन बंद करावे, अशी मागणी यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Connectionagrowon

Yavatmal News : सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असताना वीजपुरवठा होत नसल्याने ते देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे खरिपातील पिके करपण्याची भीती असल्याने भारनियमन बंद करावे, अशी मागणी यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास चार ते पाच दिवस त्याची दुरुस्ती होत नाही. परिणामी ग्रामीण भाग अंधारात राहतो. जनजीवन विस्कळीत होते.

Agriculture Electricity Connection
Mid Day Meal : पोषण आहारात आता विद्यार्थ्यांना मिळणार अंडी आणि फळे; शासनाचा निर्णय

ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याबाबत वीज कंपनीचे धोरण नेहमीच उदासीन राहिले आहे. दुसरीकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मुजोरीची भाषा केली जाते.

रोहित्रातील बिघाड तर दोन आठवड्यापर्यंत निकाली काढला जात नाही. या सर्व समस्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. कृषिपंपांना देखील नियमित वीजपुरवठा होत नसल्याने सद्यःस्थितीत पीक करपण्याची भीती आहे.

Agriculture Electricity Connection
Orange Insurance : संत्रा विमा भरपाईसाठी शनिवारी ‘रास्ता रोको’

दरवर्षी हंगामात पाण्याची उपलब्धता शेतशिवारात राहत नाही, आता मात्र पाणी असताना विजेअभावी ते देणे शक्‍य होत नाही. ग्रामीण भागाशी संबंधित हे दोन्ही प्रश्‍न येत्या आठ दिवसांत निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, संजय दांडगे, राजू गावंडे, दिनेश लोणकर, गजानन राऊत, सुशांत बोंडे, प्रशांत मोडक, जाकीर काझी, बळीराम नाटकर, जगदीश भुजाडे, संजय घोडे, रमेश सरगर, महेंद्र जरिले उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com