MPSC Exam Result agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam Result : शेतकऱ्याचा पोरगा MPSC मध्ये राज्यात पहिला, कोल्हापुरचा महाराष्ट्रात डंका

MPSC Exam Topper : कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. यावर मात करीत त्यांनी स्वतः च्या हिमतीवर लख्ख यश संपादन केले.

sandeep Shirguppe

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या राज्यसेवा परीक्षेचा काल(ता.१९) निकाल लागला. या परिक्षेत कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यामध्ये मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक नंदकुमार पाटील या तरूणाने पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम आला. ते उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांना ६२२ गुण मिळाले आहेत.

विनायकच्या निवडीने मुदाळ गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. निकाल लागल्यानंतर विनायक गावी येताच फटाके आणि गुलालाची उधळण करत त्याच्या मित्रानी उचलून घेत जल्लोष केला. तो परिक्षेत प्रथम आल्याचे समजताच त्यांच्या घराकडे ग्रामस्थांची अभिनंदनासाठी रीघ लागली आहे.

विनायक पाटील यांचे गावातील विद्यामंदिरामध्ये प्राथमिक शिक्षण झाले. परशराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांना बारावी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली होती.याच जोरावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे बी. एस्सी. पदवीचे शिक्षण घेतले.

या दरम्यान, त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी प्रथम विक्रीकर अधिकारी पदाची परीक्षा दिली. यात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. यानंतर उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा दिली.

यातही ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. ते सध्या उपशिक्षणाधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी २०२२ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यांच्या या यशाने आई-वडिलांसह गावकऱ्यांचा ऊर भरून आला आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. यावर मात करीत त्यांनी स्वतः च्या हिमतीवर लख्ख यश संपादन केले.

  • विनायकमध्ये शिक्षणाविषयी जिद्द होती. मोठा अधिकारी होणारच, असे त्याने मनाशी ठरविले होते. आम्ही त्याला काही कमी पडू दिले नाही. आमच्या कष्टाचे चीज झाले. मुलगा उपजिल्हाधिकारी झाला, याचा अभिमान आहे.

    नंदकुमार पाटील, विनायकचे वडील

  • घरच्या प्रतिकूल परिस्थितीने सतत जाणीव करून दिली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली. पुणे व कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विविध परीक्षा दिल्या. कोणत्याही क्लासेसला न जाता स्वयंअध्ययनावर भर दिला आणि त्याच जोरावर आजचे यश मिळाले.

    विनायक पाटील

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT