Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करावा

Natural Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि फायद्याची शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी अशोक पवार यांनी केले.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि फायद्याची शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी अशोक पवार यांनी केले. राज्य शासन, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोमवारी (१ जुलै) कृषी दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हा कृषी अधिकारी संदीप पवार, भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी भाऊसाहेब बोरकर, कृषी विभागाचे चंद्रकांत विपट आदींसह शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजते शेतकरी, प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात विमुक्त सेंद्रिय शेती, बांबूशेती, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना आदींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणारे शेतकरी गुलाब घुले आणि एसआरटी तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते शेतकरी किरण यादव यांनी आपले अनुभव सांगून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी एस ए. कारंडे, कृषी विस्तार अधिकारी विजय कोळी, शिवराज पाटील, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे लक्ष्मीकांत कणसे आदींनी विशेष प्रयत्न केले.

दीपाली चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विठ्ठल दानवले यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीमधील कार्यक्रम झाल्यानंतर नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT