Dr. Deepak Kachhave Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Advice on Sowing : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यासच पेरणी करावी. जमिनीत योग्य प्रमाणात ओल आल्यावरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी, पिकांचे वाण निवडताना आपली जमीन व हवामानानुसारच निवडावे.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यासच पेरणी करावी. जमिनीत योग्य प्रमाणात ओल आल्यावरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी, पिकांचे वाण निवडताना आपली जमीन व हवामानानुसारच निवडावे. एकाच वाणाच्या मागे पडू नये, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांनी मच्छिंद्र चिंचोली (ता. घनसावंगी) येथील ॲग्रोवन संवाद कार्यक्रमात सोमवारी (ता. २७) केले.

डॉ. कच्छवे म्हणाले, की कपाशी लागवड करताना कोरडवाहू जमिनीत चार फूट बाय दोन फुटावर लागवड करावी. बागायती जमिनीसाठी पाच बाय एक वर लागवड करावी. दादा लाड तंत्रज्ञानाप्रमाणे जर लागवड करायची असेल तर तीन बाय एक फुटावर लागवड करावी. झाड ३० ते ३५ दिवसाचे झाल्यावर गळ फांद्या काढून टाकाव्यात. तसेच ५५ दिवसानंतर झाडाचा शेंडा कापावा, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीज प्रक्रियेमुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. तसेच कीड व रोगांचे नियंत्रण होते.

रीवुलीस इरिगेशन इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणारे यांनी ठिबक सिंचनाच्या कार्यक्षम पद्धतीने कसा वापर करावा यावर मार्गदर्शन केले. ठिबकचा वापर केल्यामुळे जमीन कायम वापसा स्थितीत राहते. त्यामुळे पिकांची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता वाढते व उत्पादन जास्त येते.

ठिबकचा वापर करताना गरजेनुसारच पाणी द्यावे. तरच ठिबकचा फायदा होतो व ठिबक योग्य दाबाने चालवावे व जमिनीचे सर्वेक्षण करूनच ठिबक बसवावे. तालुका कृषी अधिकारी एस. एन. पवळ म्हणाले, की शेतकऱ्यांनी तुटवडा असलेल्या वाणाच्या पाठीमागे लागू नये. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने कोणी बियाणे विकत असतील तर त्याच्यावर शासन कारवाई करेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित वाणी यांनी केले.

तर आभार प्रदर्शन चेतन सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला गावाचे सरपंच श्री घोगरे, कृषी सहायक व्ही. पी. रेंगे, मंडळ कृषी अधिकारी एस. एम. माळवे, प्रगतशील शेतकरी बंडू रानमळे, माजी सरपंच विष्णू बीडे, रीवुलीस इंडियाचे व्यवस्थापक शशिकांत राठोड, अजित कुणकीकर, हनुमान पडोळे इत्यादी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT