Nashik News: अर्ली द्राक्ष हंगामात यंदा उत्पन्न मिळण्याची आशा होती. कर्ज काढून बागा जगविल्या. पण पावसाने घात केला. सोन्यासारखा द्राक्षमाल मातीमोल झाला. थोडाफार माल वाचला, त्यातून खर्चही निघणार नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. राज्य सरकारने क्रॉपकव्हर योजना आणली; मात्र अटी-शर्तींमुळे काहीच फायदा नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांना यंदाही ‘तडा’ गेला, अशी वेदनादायी परिस्थिती बिजोटे (ता. बागलाण) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी पोपट जाधव सांगत होते..गेल्या सहा वर्षांपासून कसमादे भागातील अर्ली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अस्मानी संकटांनी ग्रासले आहे. यंदाही मॉन्सूनोत्तर पावसाने १९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान तडाखा दिल्याने जवळपास ३५० एकरवर फटका आहे. यापूर्वी कसमादे भागात १,५०० हेक्टरवर अर्ली द्राक्ष उत्पादन घेतले जायचे. मात्र दरवर्षीच्या नुकसानीमुळे बागा तुटून क्षेत्र ४० टक्क्यांवर आले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण द्राक्ष माल तयार केला. मात्र अतिवृष्टीने स्वप्नांचा चक्काचूर केला..Grape Farmers Issue: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करा.द्राक्ष बागांमध्ये प्रामुख्याने साखर उतरत असलेल्या काढणीयोग्य घडांना तडे गेले आहेत. त्यामुळे पूर्ण घड खराब होत असल्याचे विदारक चित्र करंजाडी खोऱ्यातील बिजोटे परिसरात पाहायला मिळत आहे. तयार द्राक्षमण्यांना तडे जाऊन पूर्ण घड खराब होत आहे. घडांना बुरशी येण्यासह घड सडू लागल्याने बागांमध्ये वास येण्यास सुरुवात झाली आहे..‘क्रॉप कव्हर’मुळे दिलासाद्राक्ष उत्पादकांनी लाखोंची गुंतवणूक करून बागांवर ‘क्रॉप कव्हर’ अंथरुन संरक्षित शेतीचा पर्याय निवडला. त्यांचे नुकसान टळले. अशा शेतकऱ्यांचे खुडे होऊन चांगले दर देखील मिळाले. मात्र क्रॉप कव्हर नव्हते, अशा ठिकाणी नुकसान दिसून येत आहे. सरकारने क्रॉपकव्हर योजना अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा. फक्त योजनेपुरती नाही, तर व्यावसायिक पद्धतीने संरक्षित शेतीला चालना दिली तर नुकसान टळेल व भरपाईची गरज उरणार नाही, असे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक कृष्णा भामरे यांनी सांगितले..Grape Farmers: घड जिरण्याच्या समस्येने स्वप्नंही विरली.या गावांमध्ये नुकसानबिजोटे, पिंगळवाडे, करंजाड, वाघळे, श्रीपूरवडे, निताने, पारनेर, तळवाडे, टेंभे, डांग तळवाडे, मुंगसे आदी..नुकसान ४० ते ५० कोटींच्या घरातयेथील शेतकऱ्यांना एकरी ८ ते १० टन द्राक्ष उत्पादन मिळते. त्यामुळे एकरी सरासरी ७ ते ८ लाखांचे नुकसान आहे. हे दुष्टचक्र २०१९ पासून येथील शेतकऱ्यांचे पाठ सोडत नसल्याची स्थिती आहे. मण्यांना तडे गेल्याने हा द्राक्ष माल व्यापारी घेत नाहीत. त्यामुळे नुकसानीचा आकडा ४० ते ५० कोटी रुपयांच्या घरात असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटे सोसण्याची ताकद उरली नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत..१५० रुपयांच्या मालाचे ८ रुपये किलोने सौदेपावसामुळे तडे गेलेली आणि खराब झालेली द्राक्षे आता विक्रीयोग्य राहिलेली नाहीत. या मालाची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या आहे. नाइलाजाने हा तडे गेलेला द्राक्ष माल वाईन निर्मितीसाठी अवघ्या ८ रुपये प्रति किलो दराने देण्याची वेळ आली आहे. सलग १५ दिवसांच्या पावसाने डोळ्यादेखत कष्टाने पिकवलेली द्राक्ष खराब झाली.त्यांची मातीमोल दरात विक्री होत आहे. एकरी जवळपास ३ लाखांपर्यंत खर्च झाला. हा खर्चही निघणार नाही, अशी माहिती तरुण शेतकरी दीपक अभिमन जाधव यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.