Mushroom Agrowon
ॲग्रो विशेष

Mushroom Production : आळिंबी उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे

Vice Chancellor Dr. By Digambar Shirke : शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवावे, तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

Team Agrowon

Kolhapur News : शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवावे, तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभाग, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय ‘धिंगरी अळिंबी (ऑयस्टर मशरूम) लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला.

त्याच्या उद्‍घाटन समारंभात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. पदार्थविज्ञान प्रशिक्षणात अनुसूचित जाती-जमातींतील प्रशिक्षणार्थींसह सुमारे २५० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ व प्रशिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी अळिंबी उत्पादनाचे महत्त्व विषद केले. कार्यशाळेतील पहिल्या सहा नोंदणीकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते अळिंबी उत्पादनाच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील, सामाजिक वंचितता केंद्राचे सहायक संचालक डॉ. अविनाश भाले, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे, कृषी सहायक नामदेव देसाई, डॉ. हेमराज यादव, चेतन भोसले आदी उपस्थित होते.

इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले. डॉ. अभिजित गाताडे यांनी सूत्रसंचालन केले, ‘एसयूके-आरडीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले.

एक हजार पेट्यांमध्ये उपक्रम

या उपक्रमाअंतर्गत एक हजार पेट्या मधपालानासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० पेट्या देण्यात येणार असून आतापर्यंत ५० मधपालांना ४० पेट्या देण्यात आल्या आहेत. जिथे फुलोरा जास्त आहे त्या काळात एका मधपेटीतून सामान्यतः २५-३० किलो मध निघतो.

शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला एका शेतकऱ्यास कमीत कमी ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात. या व्यतिरिक्त पोळ्यातून निघणाऱ्या मेणापासून अन्य उत्पादनेही तयार होतात. देवडे आणि किरबेट या गावांना मोठा इतिहास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT