Food Processing Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Processing : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यातीवर भर द्यावा

Agriculture Export : शेतकऱ्यांनी उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया उद्योग व निर्यातीवर भर द्यावा, असा सल्ला बीडच्या ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी दिला.

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांनी उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया उद्योग व निर्यातीवर भर द्यावा, असा सल्ला बीडच्या ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी दिला. सहकार व पणन विभागाअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाअंतर्गत विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, लातूर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषी विभाग व आत्मा विभाग बीड व कृषी विज्ञान केंद्र, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोसंबी उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई) येथे शुक्रवारी (ता. २७) करण्यात आले होते.

त्या वेळी श्री. साळवे बोलत होते. व्यासपीठावर लातूरचे ‘मॅग्नेट’चे विभागीय प्रकल्प अधिकारी गणेश पाटील, सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, महाराष्ट्र, कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, उपप्रकल्प संचालक आत्मा सूरज पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, ॲग्रीप्लास्ट कंपनीचे सोमनाथ जाधव, कन्सल्टंट मॅग्नेट गजेंद्र नवघरे, सामाजिक समावेशन व लैंगिक समानता अधिकारी मॅग्नेट अक्षय हातागळे आदींची उपस्थिती होती.

या वेळी गणेश पाटील यांनी, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या संधी व मॅग्नेट प्रकल्पाची तसेच मोसंबी पिकाबरोबरच इतर पिकांचे मार्केटिंग व्यवस्थापन व ग्लोबल गॅप प्रमाणिकरण याविषयी सविस्तर माहिती दिली.

हेमंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी पीक लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे समजावून सांगितले व जातींची सविस्तर माहिती दिली. डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मोसंबी पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. श्रीकृष्ण झगडे, सोमनाथ जाधव, श्री. हातागळे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे १३० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. हेमंत जगताप यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT