Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : चंद्रपूर जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

Kharif Season : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८६ हजार ५६१ हेक्टर क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८६ हजार ५६१ हेक्टर क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत. पाऊस बऱ्यापैकी असल्याने पीक परिस्थितीही उत्तम असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबीन आणि तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.

जून महिना लागताच जिल्ह्यातील काही भागांतच थोडाबहुत पाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत दिली होती. त्याचा परिणाम काही भागांतील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.

मात्र, जुलै महिना लागताच पावसाने आपला रंग दाखविला. सहा ते दहा जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने रखडलेल्या पेरण्यांनी वेग घेतला. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेचार लाख आहे. त्यापैकी तीन लाख ८६ हजार ५६१ क्षेत्रांवर आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत.

पीक क्षेत्र

धान १,०४४९५

तूर २८,९२४

सोयाबीन ५५८९५

कापूस १९०६३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Scheme: सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय का?; मुख्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा

Maharashtra State Agriculture Awards: लातूर जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

Rural IT Professionals: ग्रामीण आयटी व्यावसायिकांना अद्ययावत शिक्षणाची संधी मिळणार

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; नदीनाले प्रवाहित, शेतीकामांना वेग

Agriculture Training: बाभूळगाव येथे दुग्ध व्यवसाय, संतुलित खत वापराबाबत मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT