
Pune News: पुणे जिल्ह्यात खरीप पेरण्यांमध्ये बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुके अव्वल ठरले आहेत. बारामती उपविभागात आतापर्यंत ११४.९ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याने १०० टक्क्यांहून अधिक पेरणी केलेली नाही, परंतु बारामती उपविभागाने ही कामगिरी केली आहे. मात्र बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागात पावसाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
जुलै २०२५ मध्ये इंदापूर तालुक्यात केवळ १८ मिलिमीटर पाऊस झाला तर बारामतीत १९.३ मिलिमीटर आणि पुरंदरमध्ये २८.८ मिलिमीटर (२२.६ टक्के) पावसाची नोंद आहे. कमी पावसामुळे बाजरी, मका, भुईमूग आणि कडधान्यांसारख्या खरीप पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी करूनही पावसाअभावी पिके सुकण्याचा धोका आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
विशेषत: जिरायती भागातील शेतकरी अडचणीत आले असून, पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मे २०२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता, परंतु आता पावसाच्या कमतरतेमुळे त्यांच्यासमोर नवे संकट उभे आहे.
विभागातील प्रमुख पिकांचा आढावा...
बारामती: बाजरी (५,६५० हेक्टर) आणि मका (४,४०१ हेक्टर) यांनी तालुक्यातील खरीप क्षेत्राचा निम्म्याहून अधिक हिस्सा व्यापला आहे. जिल्यात सूर्यफुलाची सर्वाधिक पेरणी (२०३ हेक्टर) याच तालुक्यात झाली आहे. तसेच, कडधान्याखाली ८७० हेक्टर क्षेत्र
इंदापूर : मक्याची सर्वाधिक पेरणी (१७,०४० हेक्टर) झाली असून, कडधान्याखाली ४०० हेक्टर क्षेत्र
पुरंदर : बाजरीची सर्वाधिक पेरणी (१०,४४८ हेक्टर) झाली आहे, तर भुईमूग २,४६५ हेक्टर आणि कडधान्य २,३५७ हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले आहे.
दौंड : कडधान्याखाली ५४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय पेरणी तपशील (हेक्टरमध्ये)
तालुका बारामती इंदापूर दौंड पुरंदर
सरासरी ११,७९६ १४,००६ ६१३१ १८,५३१
पेरणी १२,६३३ १८,३७२ ७३९७ १६,९४४
पेरणी दृष्टिक्षेपात
बारामती उपविभागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या कमतरतेतही पेरणीची सरासरी ओलांडली.
इंदापूर आणि दौंड तालुक्यांमध्ये अनुक्रमे १३१ टक्के आणि १२१ टक्के पेरणी.
जिरायत भागात पावसाची कमतरता, पिकांच्या वाढीवर परिणाम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.