
Sangli News : जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम आली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात २ लाख १८ हजार ४५७ हेक्टरवर पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत इतकीच पेरणी होण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात यंदा मे महिना आणि जून महिन्यात सतत पावसामुळे पेरण्या विलंबाने सुरू झाल्या. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर इतके असून २ लाख १८ हजार ४५७ हेक्टरवर म्हणजे ८८ टक्के पेरणी झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्के पेरणी झाली होती. वीस दिवसात १८ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे.
बदलते वातावरण आणि रिमझिम पावसामुळे मका, मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर काही प्रमाणात रोग किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात नमुद केले आहे. शेतकऱ्यांनी रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात २ लाख ४० हजार १९० हेक्टर म्हणजे ९३ टक्के इतका पेरा झाला होता. यंदाच्या हंगामात २ लाख १८ हजार ४५७ हेक्टरवर म्हणजे ८८ पेरा झाला आहे. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून येत्या पंधरा ते वीस दिवसात पेरण्या पूर्ण होतील. भात पिकाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे चित्र आहे.
सोयाबीचे क्षेत्र घटणार की वाढणार?
जिल्ह्यात गत खरीप हंगामात ३५ हजार ९५२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, यंदा मे महिन्यापासून जून अखेर सतत पावसामुळे सोयाबीनच्या पेरणीसाठी वाफसा मिळाला नाही.
त्यामुळे पेरणीला अडथळा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतही ३० हजार ८३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वाळवा तालुक्यात ८ हजार ८२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र यंदाच्या खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार की वाढणार याचा अंदाज पेरणी पूर्ण झाल्यानंतर समोर येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.