Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : अदृश्‍य पाणीवाटप वितरिका झाली पुनरुज्जीवित

Canal Irrigation : प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडला तर वर्षानुवर्षांचा अनुत्तरित असलेला प्रश्‍नातून मार्ग निघतो. याचा प्रत्यय निफाड तालुक्यातील देवपूर, पंचकेश्‍वर, कुंभारी येथील शेतकऱ्यांनी आणून दिला.

Team Agrowon

Nashik News : प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडला तर वर्षानुवर्षांचा अनुत्तरित असलेला प्रश्‍नातून मार्ग निघतो. याचा प्रत्यय निफाड तालुक्यातील देवपूर, पंचकेश्‍वर, कुंभारी येथील शेतकऱ्यांनी आणून दिला.

अतिक्रमणामुळे गेली पंधरा वर्षांपासून अदृश्‍य झालेली पाणीवाटप वितरिका चारी क्र. ८ गेल्या दोन दिवसांपासून प्रवाहित झाली आहे. पंधरा वर्षांनंतर वितरिका पुनरुज्जीवित झाल्याने शेतकऱ्यांनी जलपूजन केले. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील तीन गावातील सुमारे ५०० हेक्टर ओलिताखाली येणार आहे.

पालखेड डाव्या कालव्याचे रब्बी हंगामाचे आवर्तन सध्या सुरू आहे. यंदाचे आवर्तन देवपूर, पंचकेश्‍वर, कुंभारी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कारण गेली पंधरा वर्षांपासून नामशेष झालेली वितरिका क्र.८ पुन्हा एकदा खळखळून वाहत आहे.

अतिक्रमणांच्या विळख्यात व देखभालीअभावी ८ क्रमांकाची वितरिका नामशेष झाली होती. बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते. वितरिका बंद असल्याने रब्बी व खरीप हंगामांत पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येऊन ही शेतीशिवार कोरडेच राहत होते; पण गतवर्षी ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेतुन वितरिका क्र. ८ ची पुन्हा बांधणी करण्यात आली.

वितरिकेच ठिकठिकाणी बांधकाम दुरुस्ती, पाणी मोजमाप यंत्र अशी कामे करण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांनी ही स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे वितरिकेचा श्‍वास मोकळा होऊन प्रवाहित झाली. मोजमाप यंत्र बसविल्याने कोट्याप्रमाणे पाणी घेता येणार आहे. तीन पाणी वापर संस्था स्थापनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांना पाणीचे आरक्षणाचा दावा सांगता येणार आहे.

वितरिकेला पाणी आल्याने परिसराती हेक्टरवरील द्राक्ष, गहू, कांदा आदी पिके बहरणार आहेत. प्रशासन व शेतकऱ्यांच्या समन्वयातून हा आनंदाचा क्षण उभा राहिला. शेतकऱ्यांनी वितरिकेचे जलपूजन करतांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

जलपूजनप्रसंगी पिंपळगाव बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर शिरसाट, शाखा अभियंता जैसेल चौरसिया, कालवा निरीक्षक दत्तात्रय पवार, कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपविभागीय अभियंता प्रशांत गोवर्धने, विश्‍वास चौधरी, कर्मचारी पाटील पवार, शिंदे निफाडे यासह पाणी वापर संस्थेचे संपतराव वाकचौरे, नारायण पाटील, लक्ष्मण आहेर, भाऊसाहेब शंखपाळ, गुलापराव लोखंडे, सखाराम ढोमसे आदी उपस्थित होते.

गेली पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या वितरिका क्र.८ कार्यान्वित करण्यात यश आले. अतिक्रमणे हटविल्याने शेतकऱ्यांचे यात सहकार्य लाभले. सुमारे ५०० हेक्टर शेतीशिवार यामुळे ओलिता खाली येईल.
-प्रशांत गोवर्धन, उपविभागीय अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LPG Price Hike Protest: गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण

Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक

Minister Dr. Pankaj Bhoyar: वेतनेतर अनुदान धोरणाचे पुनर्विलोकन करण्याचे प्रस्तावित

SCROLL FOR NEXT