Farmers Delhi March Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Delhi March : दिल्लीच्या सीमेवर धडकला शेतकऱ्यांचा मोर्चा; वाहनांच्या ५ किलोमीटरपर्यंत रांगा

Noida Mahajam News : नोएडामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्लीची सीमेवर बॅरेगेटींग करण्यात आली असून मोठा पोलिस बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी आदोलन सुरू केले आहे. दिल्ली चलोच्या नाऱ्यानंतर पोलीसांनी दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावले. मात्र शेतकऱ्यांनी नोएडातील दलित प्रेरणा स्थळाजवळ बॅरिकेड्स तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत केला. यामुळे नोएडातील युमना एक्सप्रेस वे बंद करण्यात आला असून वाहनांच्या ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

'दिल्ली चलो'चा नारा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भारतीय किसान परिषद (BKP), किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) सह इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली नोएडातील शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. शेतकऱ्यांनी नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढला असून चिल्ला सीमेवर महाजाम झाला आहे.

४ हजार पोलिस बंदोबस्तावर

दिल्लीतील संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत सोडता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे पोलिसांनी दिल्ली-एनसीआरमध्ये बॅरिकेड्स उभारत वाहतुक इतर मार्गांनी वळवली आहे. यासह सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासनाने सीमेवर जवळजवळ ४ हजार पोलिस बंदोबस्तावर ठेवले आहेत. नोएडातील सर्वच रस्त्यांवर पोलिस उतरले असून विविध ठिकाणी पोलिस आणि आंदोलक शेतकरी समोरा-समोर आले. सध्या शेतकरी दिल्लीकडे निघाले असून कंटेनरवर चढून ते आंदोलन करत आहेत.

जाम सदृश्य परिस्थिती

पायी निघालेले शेतकरी दलित प्रेरणा स्थळावर थांबले असून ते आता महामाया पुलावरून पुढे जात आहेत. यामुळे पूल ठप्प झाला आहे. यामुळे काही वेळातच नोएडामध्ये अनेक किलोमीटर लांबच्या लांब वाहणांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामाया उड्डाणपुलापासून चिल्ला हद्दीपर्यंत जाम सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाही

शेतकऱ्यांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी दिल्ली चलोचा नारा दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच शेतकरी संसदेला देखील घेराव घलणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने या आंदोलनासाठी दिल्लीत प्रवेश देण्यात आलेला नाही, अशी माहिती पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही नोएडा पोलिसांशी समन्वय साधत आहोत. दिल्ली-यूपीमध्ये सर्व लहान-मोठ्या ठिकाणी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचीही माहिती डीसीपी गुप्ता यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT