Farmer protest Agrowon
ॲग्रो विशेष

Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Surat Chennai GreenField Highway : सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. नाशिकमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.

Swapnil Shinde

Nashik News : सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी (Surat-Chennai Greenfield Highway) संपादित जमिनींना कमी दर मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमीन भूसंपादनास काही दिवसांपूर्वी सोलापूर (Solapur), धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. आता नाशिकमधील शेतकरी (Nashik Farmer) आक्रमक झाले असून हजारो शेतकऱ्यांनी नाशइक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

केंद्र सरकारच्या भारतमाला (Bharatmala) प्रोजेक्ट अंतर्गत येणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे हा सर्वात मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा महामार्ग नाशिक, अहमदनगर, धाराशिव व सोलापूर या चार जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यासाठी जमिनी संपादनाचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, त्यांना रेडीरेकनर दरापेक्षा कमी दर दिल्याने शेतकरी नाराज आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार आज सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यात आला आहे.

ज्या बागायती जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना योग्य मोबदला द्यावा, या मागणीसाठी नाशिक, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर तालुक्यातील एकत्र येत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT