Onion Market : नाशिकमध्ये बुधवारपासून कांदा लिलाव बंद, व्यापारी संघटनेचा इशारा

Onion Export duty : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लागू केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बुधवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिशनने घेतला आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik News : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. या निर्णयामुळे कांद्याचे दर पडल्याने व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील बेमुदत लिलाव बंद करण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.

Onion Market
Onion Export Duty : कांदा निर्यातशुल्क वाढीचा फेरविचार करावा ; डॉ. भारती पवारांची पीयुष गोयल यांच्याकडे मागणी

केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. हे निर्यात डिसेंबर पर्यंत लागू असणार आहे. त्याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार असल्याने लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मध्यस्थी केल्याने संप मागे घेतला होता. व्यवहार सुरू झाल्यानंतर नाफेडच्यावतीने कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली. हा कांदा बाजार दाखल झाल्याने कांद्याचे दर पडले आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणारा तोटा सहन होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने बुधवार, २० तारखेपासून बेमुदत बंद घोषित केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बंद राहणार आहेत. या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होणार असून सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com