'Rail roko' Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

'Rail roko' Agitation : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल्वे रोको आंदोलन सुरूच; प्रवाशांना फटका 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली शंभू सीमेवर हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन आता आणखीन तीव्र झाले असून आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १७ एप्रिलपासून रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांना हरियाणा सरकार जोपर्यंत सोडत नाही. तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. तर या आंदोलनामुळे फिरोजपूर विभागातील ४९४ गाड्या प्रभावित झाल्या असून १७१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर २८६ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर या आंदोलनाचा थेट फटका रेल्वे प्रवाशांना बसत असून ऐन उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.

हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर आंदोलक शेतकरी बसले आहेत. मात्र दोन महिने ओलडूंनही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. यादरम्यान नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी अटक केल्याने आंदोलन तीव्र झाले आहे. तर या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी वेळोवेळो सरकारला अल्टीमेट दिल्यानंतर आता  संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने मोर्चा उघडला आहे. 

शंभूमध्ये सहाव्या दिवशी

शंभूमध्ये १७ एप्रिलपासून रेल्वे रुळांवर शेतकरी आंदोलनास बसले असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल रोको आंदोलनामुळे सहाव्या दिवशी ६० गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून ४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

पैसे परत करावे लागले 

या दरम्यान फिरोजपूर विभागातील ४९४ गाड्या प्रभावित झाल्या असून १७१ गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे विभागाला प्रवाशांचे पैसे परत करावे लागले आहेत. आतापर्यंत ९४४ प्रवाशांना ४ लाख ९७ हजार रूपयांचा परतावा रेल्वे विभागाने केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगितले आहे. 

नेमके कारण काय? 

एमएसपी हमी कायदा, कर्जमाफीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. यादरम्यान नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. यावरून शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. 

महत्त्वाच्या रेल्वे सेवा प्रभावित 

शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनामुळे महत्त्वाच्या रेल्वे सेवा प्रभावित झाल्या आहेत. याचा थेट फटका अमृतसर, नवी दिल्ली, लुधियाना, भटिंडा या प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेंवर झाला आहे. तर अमृतसर दिल्ली दरम्यान अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT