Punjab Farmer Protest : पंजाबमध्ये भाजपच्या उमेदवारांना शेतकऱ्यांचा विरोध का? |पीक विमा योजनेत तीन राज्य सहभागी होणार?

शेतकऱ्यांना तिथून हटवण्यासाठी संधु यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किसान मजूर मोर्चाचे नेते सरवण सिंग पंढेर यांनी केली होती.
Punjab Farmer Protest
Punjab Farmer ProtestAgrowon

तीन राज्य पुन्हा विमा योजनेत सहभागी होणार?

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने झारखंड आणि तेलंगणा पुन्हा सामील होण्याची शक्यता असल्याचं वृत्त बिझनेसलाईन या वृत्तसंस्थेनं दिले आहे. बिहार राज्याने या योजनेत सामील व्हावे यासाठी चर्चा सुरू आहे. तेलंगणात सत्तांतर झाल्यानंतर तेलंगणा राज्य सरकारने विमा योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. २०२४ च्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेत राज्यांची नोंदणी सुरू झाली. खरीप हंगामासाठी विमा योजनेत नाव नोंदणीसाठी १ एप्रिलपासून राज्यांनी नोंदणी करून प्रीमियम निश्चित करावा लागतो.

काही राज्यानुसार त्यात बदलही केले जातात. २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून २०२० साली आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि झारखंड राज्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यही केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडले होते. परंतु आता पुन्हा एकदा झारखंड, तेलंगणा आणि बिहार राज्य योजनेत सहभागी होतील, असल्याचं बोललं जात आहे.

भाजप उमेदवारांना पंजाबमध्ये विरोध

पंजाबमध्ये भाजप उमेदवारांना शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप उमेदवारांच्या सभेच्या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजूर मोर्चाच्या बॅनरखाली निषेधाच्या घोषणा देण्याच्या घटना पंजाबमध्ये घडू लागल्यात. पंजाबच्या अमृतसरमध्ये १७ एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार तरणजीत सिंग संधु यांच्या सभेच्या दरम्यान २०-३० शेतकऱ्यांनी एकत्र येत शंभू सीमेवर पोलिस हल्ल्यात जीव गमवलेल्या शुभकरण सिंग यांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी संधु यांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यामध्ये बाचाबाची झाली.

त्यानंतर शेतकऱ्यांना तिथून हटवण्यासाठी संधु यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किसान मजूर मोर्चाचे नेते सरवण सिंग पंढेर यांनी केली होती. अखेर अमृतसर ग्रामीण पोलिसांनी जगबीर सिंग आणि केवल सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवले आहेत. याआधी भाजपच्या उमेदवार परमपाल कौर सिंधु, अकाली दलाच्या सिकदेर सिंग मालुका यांना भट्टीडा येथे शुक्रवारी शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं. हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं दिल्ली चलो पुकारलेलंय.

जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी कडक बंदोबस्त

चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्र हा जोतिबा यात्रेचा महत्त्वाचा दिवस असतो. पहाटे पाच ते सहा वाजता जोतिबाचा शासकीय महाभिषेक या दिवशी करण्यात येतो. त्यानंतर दुपारी यात्रेला सुरुवात होते. चैत्र पौर्णिमेला जोतिबा पर्वतावर मोठा उत्सव साजरा केला जातो. राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविक येत असतात. यंदाच्या जोतिबा चैत्र यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलीय. २३ एप्रिल रोजी चैत्र यात्रेचा उत्सव आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून ९ ते १० लाख भाविक येत असतात. त्यामुळं प्रशासनानम ६०० पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखेचे २०० कर्मचारी तर १०० पोलिस अधिकारी तैनात केले आहेत, अशी माहिती पंडित यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com