Delhi Farmers Protest : दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूचं ; शेतकऱ्यांचा विरोध कायम

Delhi Chalo Protest : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातही आंदोलनाची दाहकता कायम आहे. काही दिवसांतच आंदोलनाला दोन महिने पूर्ण होतील.
Farmers Protest
Farmers Protest Agrowon

Pune News : हमीभावाच्या कायद्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकराविरोधात १३ फेब्रूवारीपासून सुरू झालेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातही आंदोलनाची दाहकता कायम आहे. काही दिवसांतच आंदोलनाला दोन महिने पूर्ण होतील.

मात्र, असून शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन अजून किती दिवस सरू राहणार हे कोणीच सांगू शकत नाही.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन

राजधानीकडे कूच

पंजाब आणि हरियाणातील आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलक शेतकरी एकत्र आले आहेत. हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १३ फेब्रूवारीला 'दिल्ली चलो' आंदोलनाची हाक दिली आहे. खाण्यापिण्याच्या साहित्यांसह हजारो ट्रॅक्टर आणि ट्रक घेवून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे कूच केली. परंतु सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांना दिल्लीपासून २०० किमी अंतरावरच रोखून धरले आहे.

ज्याठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्यात आले त्याचठिकाणी शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला आहे. गेल्या काही आठवड्यात शेतकरी आणि सुरक्षा दलाच्या जवनांमध्ये छोट्या-मोठ्या चकमकीही झाल्या. आंदोलनादरम्यानपोलिसांच्या आक्रमतेमुळे शुभकरण सिंह या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : २०२० सालचं शेतकरी आंदोलन आणि आत्ताच्या आंदोलनात फरक काय?

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी संघटना पिकांसाठी हमीभावाचा कायदा करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी तीन कृषी कायद्यांविरोधात एक वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांनी अशाच पध्दतीचे आंदोलन केले होते.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर झुकत कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच यावेळी मोदींनी हमीभावासंदर्भात समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ते आश्वासन पूर्ण केले नसून त्याची वाटचाल संथ गतीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांनी कर्जातून मुक्त करावे. तसेच लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय देण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारल्याच्या आरोपात अटकी करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या महिनाभरात शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलनांची धार तीव्र करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संघटनांनी देशभरातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्याचे, मंत्र्यांचे पुतळे जाळण्याचे, रेल्वेमार्ग रोखण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनाचा फारच कमी परिणाम झाला आहे. आंदोलनाची धग दिल्लीच्या उत्तरेतील तीन ठिकाणांपुरताच सध्यातरी मार्यादित असल्याचे दिसत आहे. जेथे शेतकऱ्यांना सुरूवातीला रोखण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com