Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Assistant Strike : पीएम किसान, ‘नमो शेतकरी’च्या तपासणीची कामे ठप्प

PM Kisan Scheme Work : पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या भौतिक तपासणीची कामे ठप्प आहेत. ही तपासणी वेळेत झाली नाही तर पुढचा हप्ता वेळेत मिळू शकणार नाही.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने ऐन खरिपातच कृषी विभाग व शेतकऱ्यांशी संपर्क तुटला आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या भौतिक तपासणीची कामे ठप्प आहेत. ही तपासणी वेळेत झाली नाही तर पुढचा हप्ता वेळेत मिळू शकणार नाही.

नवीन लाभार्त्याना योजनेचा लाभ घेता न येण्याचा धोका उद्‍भवला आहे. शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सीडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबीची पूर्तता करणे शासनाकडून सुरू आहे. यासाठी कृषी सहायक महत्त्वाचा दुवा आहे.

याशिवाय ज्या ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यांची तपासणी ही कृषी सहायक मार्फत होत असते. ही तपासणीही सध्या ठप्प आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सुरू असणारे बियाणे निवडी बाबतचे मार्गदर्शन, हुमणी कीड नियंत्रणासाठीचे उपाय उगवणक्षमता,बीजप्रक्रिया, माती नमुने परीक्षण साठी माती जमा करणे

आदींसह शेतकरी संपर्काची कामे ठप्प झाली आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने अंतर्गत जून मध्ये लागवड करणे आवश्यक असते त्याचे प्रस्ताव घेणे व तपासणीही पूर्ण बंद आहे. याचा भार नवीनियुक्ती केलेल्या सुमारे ऐंशी कृषी सेवकावर पडला आहे. विविध मागण्यासाठी कृषी सहायकांनी गेल्या काही दिवसापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे.

सुधारित व संकरित बी-बियाण्यांचा प्रचार व प्रसार करणे, शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आदी कामे सुरू होती. अनेक ठिकाणी शेती शाळा ही घेण्यात येत होत्या. हा संप पुकारल्यानंतर मात्र यामध्ये शिथिलता आली. शासनाकडून संप मिटविण्याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने कृषी सहायकानी आंदोलन तीव्र केले आहे.

सध्या जिल्ह्यात सुमारे ८०कृषी सेवक कार्यरत आहेत. आता त्यांच्यामार्फतच शक्य होईल तेवढे काम सुरू आहे.कृषीसहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गावडे व सचिव अनिल कांबळे यांनी सांगितले, की विभागीय कृषी सहसंचालकांबरोबर नुकतीच बैठक झाली, पण याबाबत काही तोडगा निघू शकला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

SCROLL FOR NEXT