Agricultural Assistants Strike: कृषी सहाय्यकांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Farmer Problems: मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे खरिप हंगामातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. बीज वितरण, पंचनामे आणि प्रशिक्षण यासह अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऐन खरिपाच्या तोंडावर मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. बीज प्रक्रियांचे प्रशिक्षण, शेतमाल निर्यात, खते, बियाणे वाटप करणे, नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. या आंदोलनाची दखल न घेतल्यास खरिपावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  

राज्यात गेल्या बारा ते चौदा वर्षांपासून आकृतिबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु हा आकृतिबंधचे काम अंतिम टप्प्यात जात नसून त्याला मंजुरी मिळत नाही. आतापर्यंत अनेक अधिकारी बदली होऊन गेले आहे. मात्र ती मागणी पूर्ण होत नाही. यामध्ये प्रामुख्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांना वर्ग एकमध्ये उच्चश्रेणीचे घेण्यात यावे. अशी प्रमुख मागणी आहे.

Agriculture Department
Agriculture Assistance Protest : कृषी सहायकांकडून ऑनलाइन योजनेच्या तपासणीची कामे ठप्प

त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी रखडली असून अनेक ठिकाणी शेतकरी प्रश्‍न वाढताना दिसून येत आहे.  सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीमध्ये वाढ होत आहे. शेतकरी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी करत आहे.

परंतु कृषी सहायकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसून शेतकऱ्यांनाही माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्यातील खैरेनगर येथील प्रगतशील शेतकरी रघुनाथ शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांप्रमाणे कृषी सहायकांच्या अनेक मागण्या आहेत. त्याबाबत सरकारने योग्य ती भूमिका घेऊन त्या सोडविणे गरजेचे आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात मार्गदर्शनाची गरज असते.

Agriculture Department
Agriculture Officers Protest: कृषी सेवा वर्ग दोन संवर्गावरील समकक्षतेचा अन्याय दूर करा

कृषी सहायकांनी खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शेतीसंबंधी बरीचशी माहिती आम्हाला मिळत नसल्याने त्याचा मोठा परिणाम खरिपावर होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. यामुळे फळबागा, कांदा, आंबा, बाजरी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी कृषी सहायकांना संपर्क केला असल्यास ते फोन उचलत नाहीत.

कृषी पर्यवेक्षक संपावर जाण्याच्या तयारीत

कृषी सहायकांच्या विविध मागण्यांप्रश्‍नी आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर राज्यातील कृषी पर्यवेक्षकही संपावर जाण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरुवात उद्यापासून (सोमवार) होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरुवातीला काळ्या फिती लावून आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर प्रश्‍न न सुटल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संघटनेच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com