Ginger Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Seed Purchase Decline: आले बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

Farmer Issue: सातारा जिल्ह्यात आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. बियाण्याचे दर जरी कमी असले तरी आले शेतीतील खर्च निघत नसल्याने शेतकरी आले बियाणे खरेदीपासून दूर राहत आहेत.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News: मागील हंगामापासून आले पिकाच्या दरात घट सुरू झाली. सध्या आले पिकास धुणीच्या नऊ ते साडेनऊ हजार रुपये तर बियाण्यास १४ ते १५ हजार रुपये प्रतिगाडी (५०० किलो) मिळत आहे. हा दर मागील तीन वर्षांत कमी असल्याने आले बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. यामुळे आगामी हंगामात आले क्षेत्रात मोठी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात आले पीक करणारा सातारा जिल्हा हा प्रमुख असून तीन ते चार हजार हेक्टरवर आले पीक घेतले जाते. मागील तीन वर्षांत गाडीला ३० हजारांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत दर धुणीच्या आले पिकास मिळाल्याने आले पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. नियमित पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी क्षेत्रात वाढ केली तर नवखे शेतकरी आले पीक घेऊ लागले होते. गतवर्षी आले पिकाच्या दरात मोठी वाढ झाली होती.

यामुळे बियाण्याचे दरही विक्रमी झाले होते. गतवर्षी ५० ते ५५ हजार रुपये प्रतिगाडी बियाण्याचे दर गेले होते. आले पिकाचे दर टिकून रहातील या आशेवर जिल्ह्यात चढत्या दराने बियाणे खरेदी केले होते. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून खते, औषधावर खर्च वाढण्यात आला. यामुळे भांडवली खर्चात एकरी एक लाख रुपायांची वाढ झाली. मात्र त्यांनतर ५५ हजारांवरून टप्प्याटप्प्याने नऊ ते साडेनऊ हजारांवर दर आले आहेत. तर बियाण्यांचे दर प्रतिगाडी १४ ते १५ हजार रुपयांवर आले आहेत.

सध्या निघत असलेले उत्पादन व दर यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक गणिते चुकू लागली आहेत. बियाणे खरेदी कमी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट पूर्ण खरेदी होत नाहीत. दरात घसरण झाल्याने नियमित आले पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून क्षेत्रात घट केली जात असून नव्याने आलेल्या शेतकऱ्यांनी आले लागणीकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणामी आले पिकाच्या क्षेत्रात मोठी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात आले बियाणे वर्षानुवर्षे केले जात आहे. येथील वातावरणामुळे सातारी आल्यास बाजारपेठेत मागणी असते. मात्र पिकावर संशोधन होत नाही. यामुळे एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्यास बियाणे दिले जाते. यामुळे उत्पादनास मर्यादा आहेत.

क्षेत्रात घट होण्याची कारणे

मागील वर्षाच्या तुलनेत दरात मोठी घट

वर्षभर पीक सांभाळून आर्थिक गणिते जुळत नाही

व्यापाऱ्यांकडून नवे-जुने खरेदीची अडचण

पुढील वर्षी दर कमी होण्याची भीती

मूळकुज नियंत्रणात न येणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT