
Kolhapur News: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या येथील शेंडा पार्क विभागीय संशोधन केंद्राची ३४ हेक्टर मोक्याची जागा ‘आयटी हब’ला देण्याचा घाट घातला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यायी जागेच्या बदल्यात या जागेवर आयटी हब करण्याच्या सूचना दिल्याने आता या जागेवरील ‘कृषी’चे कार्य थंडावणार आहे. २००४ व २०११ ला महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे कृषी विभागाने अशा जागा अन्य कामासाठी देऊ नयेत, असे आदेश काढलेले असतानाही आता नव्या सरकारने ही जागा अकृषक कामासाठी घेण्याचे ठरविले आहे.
काही वर्षांपूर्वी शहराबाहेर असणारी जागा आता मध्यभागी आली आहे. कोल्हापुरात ‘आय टी हब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या जागेच्या बदल्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यात येणार आहे. ही जागा निश्चित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीच श्री. पवार यांनी याबाबतच्या सूचना दिल्याने ही जागा आयटी हबकडे वळविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यांतील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोईनेयुक्त ६० ते १०० हेक्टर एकत्रित शेतीयोग्य पर्यायी जागा, कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे झाल्यास शहरातील संशोधनाचे कार्य शहराबाहेर जाण्याची भीती आहे. सध्या या जागेवर मका, नाचणी व तत्सम तृणधान्य पिके, उद्यानविद्या पिके व इतर पिकांकरिता जमिनीची सुपीकता तपासणी, जमिनीचे आरोग्य, जमिनीतील मूलद्रव्यांचा अभ्यास आदींबाबत संशोधन केले जाते.
उप-पर्वतीय विभागातील विविध पिकांकरिता सुधारित लागवड तंत्रज्ञान विकसित करणे. बियाणे विभाग, भात, ऊस, नाचणी, सोयबीन व इतर पिकांचा पैदासकार, प्रमाणित, सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम उप-पर्वतीय विभागातील विविध फळपिकांकरिता सुधारित लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन प्रयोग राबविणे. पंढरपुरी म्हशींचे जतन व संगोपन करणे. चारा उत्पादन क्षेत्र व चराऊ क्षेत्र आदी कामे सुरू आहेत. शासनाने ही जागा ताब्यात घेतल्यास हे सर्व काम विस्कळीत होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.