Farm Pond Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Scheme : ‘वैयक्तिक शेततळे’ योजनेसाठी अर्ज करा

Agriculture Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldana News : ‘‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रामार्फत किंवा ऑनलाइन नोंद करून वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची अनिश्चितता व उपलब्धता यामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठी घट येते. जिथे पाण्याचा ताण जास्त पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हा ओढे, नाले, नदीव्दारे वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याची साठवणूक करण्यासाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

शेततळ्यामुळे पिकाला, फळबागेला संरक्षित सिंचन उपलब्ध होऊ शकते. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, असे डॉ. म्हणाले.

सध्याची पाणी टंचाई पाहता भविष्यात फळबाग वाचविण्यासाठी सध्या उपलब्ध विहीर व बोअरवेलचे, पावसाव्दारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी रक्कम ७५ हजार रुपये अनुदान मिळते, असे डॉ. पाटील म्हणाले.

‘महाडिबिटी’वर करा अर्ज

यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडिबिटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही डॉ. पाटील यांनी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT