Summer Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Soybean Sowing : सांगलीत उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी

कृषी विभागाने ३०९ हून अधिक प्रात्यक्षिके घेतली. सुमारे १२१ हेक्टरवर पेरा झाला होता.

Team Agrowon

Sangli News : अतिपावसामुळे सोयाबीनचे (Soybean Seed) बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने (Agriculture Department) उन्हाळी सोयाबीनची पेरणी (Summer Soybean Sowing) करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रोस्ताहित केले होते. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत उन्हाळी सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांना कल वाढला होता.

मात्र, गेल्या वर्षी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल कमी झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासणार असे लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पेरणी करावी या दृष्टिने प्रोत्साहित केले.

कृषी विभागाने ३०९ हून अधिक प्रात्यक्षिके घेतली. सुमारे १२१ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यातून सोयाबीन बियाणे विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले होते.

गेल्या वर्षीदेखील सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी विभागाने ४०० हून अधिक गावात सोयाबीन पेरणीची प्रात्यक्षिके घेतली होती. त्यामुळे सुमारे १ हजार ०४८ हेक्टरवर पेरणी झाली होती.

परंतु सोयाबीन पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. उत्पादनातही घट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीनचे पीक आलेच नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT