Jackfruit Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Jackfruit Cultivation : फणस लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा

Jackfruit Farming : दरवर्षी सारख्याच पिकांची लागवड करुन कंटाळलेल्या ग्रामीण शेतकरी बांधवांनी कृषी क्षेत्रात काही वेगळे करायचे ठरवले असून ते कायमचे उत्पन्न देणाऱ्या फणसाची लागवड करु लागले आहेत.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. आधुनिक पद्धतीने शेती करुन चांगल उत्पन्न मिळवतात. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी नव-नवीन प्रयोग करत आहेत.

आता मागील दोन-चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी कायमचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळ पिकाकडे ओढा वाढला आहे. यात आंबा, काजुसोबत फणस फळ पिका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फणस लागवड सुरु केली आहे.

दरवर्षी सारख्याच पिकांची लागवड करुन कंटाळलेल्या ग्रामीण शेतकरी बांधवांनी कृषी क्षेत्रात काही वेगळे करायचे ठरवले असून ते कायमचे उत्पन्न देणाऱ्या फणसाची लागवड करु लागले आहेत. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

तालुक्यातील ओंदे, शीळ, देहर्जे, कुर्णझे, आलोंडे, मलवाडा भागात शेतकरी फणस या फळ पिकाची लागवड करू लागले आहेत. रोख पैसे अन् जागेवर विक्री उत्पादन वाढले तरी त्याला चांगली बाजारपेठ मिळणेही तेवढेच महत्वाचे आहे. फणस या पिकाला बाजारपेठेतही जाण्याची गरज भासत नाही. कारण ग्राहक थेट शेताच्या बांधावरच येऊन खरेदी करतात.

भाजीसाठी वापर

फणसाचा उपयोग हा भाजीपाला आणि फळ म्हणून देखील केला जातो. त्यामुळे बाजारात फणसाला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी फणसाचे विविध पदार्थ केले जातात त्याचबरोबर लोणचेही केले जाते. जे खायला खूप चवदार असते. फणस पिकल्यावर तो फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात.

फणसाच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. जवळपास ८ ते १० महिन्याच्या कालावधील फणस फळ योग्यरित्या तयार होते. शेतकऱ्याला त्यापासून नफा कमावता येतो.
-विजय सांबरे, शेतकरी
विक्रमगडसारख्या भागात आंबा, काजू सोबत फणस या हंगामी पिकाला मागणी देखील चांगली आहे. विक्रमगडमधील शेतकऱ्यांनी फणस हे जोड पीक घेतल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसू शकते.
-गजानन पाटील, शेतकरी,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT