Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा

Rabi Season : रब्बी हंगामाचे आवर्तन लांबल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

Team Agrowon

Pune News : रब्बी हंगामाचे आवर्तन लांबल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे डिंभे डावा कालव्यात तातडीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली केली.

डिंभे धरण ते येडगाव धरणादरम्यान ५५ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. त्याला १४ किलोमीटर लांबीचा घोड शाखा कालवा जोडला आहे. या दोन्ही कालव्यांचे सिंचन क्षेत्र ६ हजार ९६१ हेक्टर आहे. डिंभे डावा कालव्याचा लाभ प्रामुख्याने जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी, वळणवाडी, वारूळवाडी, आर्वी, गुंजाळवाडी, नारायणगाव या गावांना होतो.

वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी डिंभे डावा कालव्यालगत आहेत. डिंभे डावा कालव्याला रब्बीचे आवर्तन न सोडल्यामुळे सहा गावांतील कालवा परिसरात असणाऱ्या विहिरी व विंधन विहिरीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकासह द्राक्ष, केळी, ऊस या नगदी पिकांना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कालव्यात वेळेत पाणी न सोडल्यास रब्बी पिकांच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी दरवर्षी कालवा सल्लागार समितीची बैठक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होत असते. डिसेंबर महिन्यात रब्बीच्या आवर्तन सुरू केले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे कुकडी प्रकल्पाचा रब्बीचा आवर्तन कालावधी लांबला आहे.

याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन घेऊन डिंभे डावा कालव्यात तातडीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी वारुळवाडीचे (ता. जुन्नर) सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणनिहाय आजअखेरचा पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : १.९४३ टीएमसी (१०० टक्के), माणिकडोह : ७.४४५ टीएमसी (७३.१३) टक्के, वडज : १.१३८ टीएमसी (९७.०४ टक्के), पिंपळगाव जोगे : ३.२७५ टीएमसी (८४.१९ टक्के), डिंभे : १२.२९३ टीएमसी (९८.३९ टक्के).

कुकडी प्रकल्पातून सात तालुक्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन केले आहे. रब्बीच्या आवर्तनासाठी नियोजनानुसार ७.५३५ टीएमसी पाणी विविध कालव्यात सोडण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यात रब्बीचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ नारायणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT