Agriculture Irrigation : जायकवाडी कालवा सिंचनासाठी पाणी मागणी अर्ज करावेत

Jaykwadi Canal Irrigation : जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तने सोडण्यात येणार आहेत.
Jaykwadi dam
Jaykwadi damAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तने सोडण्यात येणार आहेत. कालव्याचे पाणी प्रवाही, उपसा, नदी नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी घ्यायचे असल्यास

शेतकऱ्यांनी गुरुवार (ता. २६) पर्यंत संबंधित शाखा कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत. पाणी वापर संस्थांनी मागील थकबाकी व अग्रिम पाणीपट्टी भरून प्रत्येक पाणीपाळी पूर्वी पाणी मागणी करणे आवश्यक आहे.

पाणी अर्ज शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. मागणी अर्ज नमुना नंबर ७, ७-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ टे कार्यकारी अभियंता पी. बी. लांब यांनी केले आहे.

पैठण जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील १२२ ते २०८ किलोमीटर मुख्य कालवा आणि त्यावरील सर्व वितरण प्रणाली कालव्यावर मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना प्रकल्पात उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगामात ३ पाणीपाळी देण्याचे नियोजन आहे.

Jaykwadi dam
Agriculture Irrigation : इसापूर प्रकल्पाचे पाणी एक डिसेंबरपासून मिळणार

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा तसेच कापूस, तूर, तेलबिया आदी इतर दुहंगामी व उभी पिके (कालावधी १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी २०२५) या पिकासाठी कालव्याचे प्रवाही-कालव्यावरील उपसा, नदी नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनाद्वारे सिंचनासाठी पाणी घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

कालवा संचालन कार्यक्रम प्राप्त मागणी क्षेत्रानुसार करण्यात येईल. लाभधारकांनी संपूर्ण थकबाकी व चालू हंगामातील पाणी घेतलेल्या पिकांची अग्रिम पाणीपट्टी भरावी लागेल. पाणीअर्जा सोबत अपत्या बाबतचे प्रमाणपत्र, अल्प व अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Jaykwadi dam
Agriculture Irrigation : पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू

प्रमाणपत्र सादर न केल्यास सूट, सवलती व प्रोत्साहने याचा लाभ घेता येणार नाहीत. दंडात्मक कार्यवाही केली जाईल. पिकांचे मागणी क्षेत्र २० आरचे पटीत असावे. शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे.

उडाप्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com