Agriculture Irrigation : पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू

Rabi Irrigation : शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कुकडी पाटबंधारे विभागाने डिंभे धरणातून डिंभे डावा व मीना शाखा कालव्यात तर पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
Water Canal
Water CanalAgrowon
Published on
Updated on

Junnar News : शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कुकडी पाटबंधारे विभागाने डिंभे धरणातून डिंभे डावा व मीना शाखा कालव्यात तर पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यांतील सुमारे पस्तीस हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना होणार आहे. आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कांदा लागवडीच्या कामांना आता वेग येणार आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे रब्बीचे आवर्तन लांबल्यामुळे कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. याचा परिणाम कांदा लागवड व रब्बी पिकांवर झाला होता.

Water Canal
Agriculture Irrigation : तुषार सिंचनाला श्रीवर्धनमध्ये पसंती

नवीन मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन कुकडीच्या रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कुकडीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांची मागणी आणि रब्बी पिकांची गरज विचारात घेऊन कुकडी पाटबंधारे विभागाने शुक्रवार (ता. ६)पासून डिंभे धरणातून डिंभे डावा व मीना शाखा कालव्यात तर पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात आजपासून रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यांतील सुमारे पस्तीस हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना होणार आहे.

Water Canal
Agriculture Irrigation : शासनाने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत उपोषण

डिंभे धरणातून डिंभे डावा कालव्यात ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी डिंभे डावा कालव्याला जोडलेल्या मीना शाखा व घोड शाखा कालव्यात वळवण्यात येणार आहे. पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात शुक्रवारी (ता. ६) सकाळपासून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

या पाण्याचा लाभ जुन्नरचा उत्तर भाग व पारनेर तालुक्याला होणार आहे. कुकडी डावा कालव्यात दहा डिसेंबरपासून आवर्तन सुरू करण्याचे नियोजन कुकडी पाटबंधारे विभागाने केले आहे. या वर्तनाचा कालावधी पस्तीस दिवसांचा असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com