Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean, Tur Rate : सोयाबीन, तुरीच्या कमी दरामुळे शेतकरी अडचणीत

Market Rate : यावर्षी कमी पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यातच तुरीचे पीक बहरात असताना पावसाचा फटका बसल्याने तुरीचेही उत्पादन कमी आहे. जे उत्पादन आले त्याला योग्य भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

Team Agrowon

Washim News : वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीपाठोपाठ सोयाबीनचे दरही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही दिवसांआधी १ हजारांवर गेलेली तूर सध्या सात हजारांपर्यंत खाली आली आहे. तर सोयाबीन ५ हजारांच्या आत आले आहेत.

यावर्षी कमी पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यातच तुरीचे पीक बहरात असताना पावसाचा फटका बसल्याने तुरीचेही उत्पादन कमी आहे. जे उत्पादन आले त्याला योग्य भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणला असता सोयाबीनला ४१०० ते ४७०० रुपये प्रति क्विंटलचा दर तर तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतो आहे. शेतमालाचे हे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही.

सरकारने ठोस उपाययोजना करून तुरीला १० हजार, तर सोयाबीनला किमान ८ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्र सरकारने तेल, कडधान्य वस्तूंच्या आयातीला परवानगी देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून सोयाबीनचे दरही खूप कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याने जगायचे तरी कसे, शासनाने तुरीला १० हजार रुपये आणि सोयाबीनला किमान ८ हजार रुपये भाव द्यावा.
शंकर मोरे, सोयाबीन उत्पादक शेतकरी
सध्या तूर काढणीसाठी आली असून बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणले असता अतिशय कमी दर मिळत असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनला ४७०० आणि तुरीला ७३०० प्रती क्विंटल भाव मिळतो आहे.
अतुल पवार, शेतकरी, पवारवाडी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT