Tur
Tur Agrowon

Tur Rate : विदर्भात नव्या तुरीला ९००० रुपयांचा दर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत.

Vidarbha Tur Rate : विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर ८७०० ते ९००० रुपयांवर स्थिरावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. जुन्या तुरीला ९३०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीत रोज सरासरी ५५० क्‍विंटलची आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मॉन्सूनोत्तर पाऊस, धुके त्याच्या परिणामी वाढलेला किड-रोग यामुळे यंदाच्या हंगामात तुरीची उत्पादकता प्रभावीत झाल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतरदेखील बाजारात तुरीला दहा हजार रुपयांच्या खाली दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारातील तुरीची रोजची आवक ५५० ते ६०० क्‍विंटल आहे.

यातील नव्या तुरीला ८७०० ते ९००० रुपयांचा दर मिळत आहे. दुसरीकडे जुन्या तुरीत ओलावा कमी असल्याचे कारण देत ९३०० रुपयांचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत अद्याप नव्या तुरीची अपेक्षित आवक होत नसल्याचे चित्र आहे.

Tur
Tur Rate: आज, १७ फेब्रुवारीला तुरीला कोणत्या बाजारात मिळाला ८ हजार ५०० रुपयांचा दर ?

डिसेंबरच्या सुरुवातीला ८७०० ते ९७०० असा दर तुरीला होता. त्यानंतर ९५००, ९०११ असा दर तुरीला मिळाला. आता सध्या ९००० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहेत. बाजारातील आवक जेमतेम चार क्‍विंटलवर स्थिरावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव बाजारात तुरीची २३ डिसेंबरला अवघी एक क्‍विंटल आवक झाली. ६२०० असा दर मिळाला.

त्यानंतर मात्र तुरीची आवकच झाली नसल्याचे सांगण्यात आले. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा (लाड) बाजार समितीत नवीन तुरीला कमीतकमी ७४०५ तर जास्तीत जास्त १००५० असा दर मिळाला.

या ठिकाणी सर्वाधिक १३० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. कारंजा बाजारात जुन्या तुरीचे दर ७०३५ ते ८९०५ प्रमाणे होते. ११० क्‍विंटलची आवक झाली. शासनाचा हमीभाव ७००० रुपयांचा आहे. परंतु त्यापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याचे समाधान असले तरी तुरीच्या दराने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता.

त्यामुळे त्याच दराने खरेदी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे व्यापारी मात्र नव्या तुरीत ओलावा अधिक असल्यामुळेच दर काही प्रमाणात दबावात असल्याचे सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com