Soybean Rate : सोयाबीन उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत

Soybean Farmer Issue : यंदाचा खरीप हंगाम संपून बराच काळ लोटला. सोयाबीनची काढणी होऊनही दोन महिने झाले. तरीही सोयाबीनचा दर ५ हजारांवर गेला नसल्याने सोयाबीन विकावे की प्रतीक्षा करावी या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : यंदाचा खरीप हंगाम संपून बराच काळ लोटला. सोयाबीनची काढणी होऊनही दोन महिने झाले. तरीही सोयाबीनचा दर ५ हजारांवर गेला नसल्याने सोयाबीन विकावे की प्रतीक्षा करावी या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे.

साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात यायला सुरुवात झाली. त्या वेळीसुद्धा सोयाबीनचा दर आजच्या दरांएवढाच होता. खेड्यातील गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी भविष्यात भाववाढ होईल या आशेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.

Soybean Rate
Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूसदरासाठी सरकारच्या मानगुटीवर बसू

आज दोन महिन्‍यांवर कालावधी लोटला तरीही बाजारभाव जैसे थेच आहेत. सोयाबीनच्‍या दरांचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. भाववाढीच्या घालमेलीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा सोयाबीनची कमालीची आवक घटलेली आहे.

या वर्षी सोयाबीनचे उत्पादनही अपेक्षित झालेले नाही. जुलै महिन्यात या भागात तीन आठवड्यांचा पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. ऐन फुलोरावस्थेत पीक असताना पावसाने दांडी मारल्यामुळे सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन आले नाही. शिवाय बी-बियाणे, कीटकनाशके, मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले दर पाहता सोयाबीनने शेतकऱ्याला फारसे काही हातात लागू दिलेले नाही. एकरी दोन क्विंटलपासून उत्पादन झाले.

Soybean Rate
Cotton Soybean Rate : ‘शेतकऱ्यांच्या हातावर तुरी...’

आधीच उत्पादन कमी झाले. याची दखल मात्र, विमा कंपन्यांनी घेतली नाही. अगदी तोकडा विमा शेतकऱ्यांना देऊ केला. काही निवडक महसूल मंडले वगळता उर्वरित भागात विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार झालेला आहे.

साठवलेल्या सोयाबीनचे काय करायचे?

हंगामात गरजेपुरते सोयाबीन विक्रीला काढून उर्वरित सोयाबीन भविष्यात भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवले. पण सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांवर जायला तयार नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहे. शिवाय व्यापाऱ्यांनी सुद्धा हंगामात सोयाबीन साठा करून ठेवला.

खासगी पतसंस्था किंवा बँकांचे कर्ज उचलून वेअर हाउसमध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवलेले आहे. आज या सोयाबीनमध्ये लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतवून ठेवले आहेत. बँकांचे व्याज बघता आणि सोयाबीन बाजाराचा कल पाहता व्यापारीसुद्धा द्विधा मनःस्थितीत आहेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com